कुत्र्याच्या तावडीतून मोराला सोडविले

By Admin | Updated: April 20, 2016 23:55 IST2016-04-20T23:48:04+5:302016-04-20T23:55:43+5:30

सरसम : सरसम बु़ परिसरातील मौजे कांडली खु़ येथे पाण्याच्या शोधात आलेल्या मोरास कुत्र्याने चावा घेवून जखमी केले़

Rescue the peacock from the dog | कुत्र्याच्या तावडीतून मोराला सोडविले

कुत्र्याच्या तावडीतून मोराला सोडविले

सरसम : सरसम बु़ परिसरातील मौजे कांडली खु़ येथे पाण्याच्या शोधात आलेल्या मोरास कुत्र्याने चावा घेवून जखमी केले़ ही घटना सामाजिक कार्यकर्ते डॉ़रविराज दूधकावडे यांच्या लक्षात येताच त्यांनी जखमी मोरास कुत्र्याच्या तावडीतून सोडून त्यास पाणी पाजले़
हिमायतनगर तालुक्यातील मौजे कांडली खु़ शिवारात २० एप्रिल रोजी दुपारी १२ च्या सुमारास पाण्याच्या शोधात मोर आला़ दरम्यान, कुत्र्याने झडप घालून त्याला गंभीर जखमी केले़ दूधकावडे यांनी मोराची सुटका करून त्यास पाणी पाजले़ वनविभागास भ्रमणध्वनीवरून ही माहिती कळविली़ वनपाल जाधव हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले़ वनपरीक्षेत्र अधिकारी तुकाराम पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सरसम बु़ येथील पशूवैद्यकीय दवाखान्यात जखमी मोरावर डॉ़लोखंडे यांनी उपचार केले़ जखमी मोर हा पूर्णत: ठिकठाक वाटत असल्याने त्यास परत जंगलात सोडण्यात आले़ (वार्ताहर)
सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवीराज दूधकावडे यांनी जखमी मोरास पाणी पाजून वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे केले सुपूर्द

Web Title: Rescue the peacock from the dog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.