शिक्षक पतसंस्थेत बचाव पॅनलची बाजी

By Admin | Updated: August 31, 2015 13:46 IST2015-08-31T13:30:41+5:302015-08-31T13:46:40+5:30

तालुका शिक्षक पतसंस्थेच्या संचालक पदासाठी रविवारी कन्या प्रशालेमध्ये पार पडलेल्या निवडणुकीत सत्ताधारी प्रगती पॅनलला धक्का देत बचाव पॅनलने १५ पैकी १३ जागा मिळविल्या.

Rescue panel stand in teacher's cadre | शिक्षक पतसंस्थेत बचाव पॅनलची बाजी

शिक्षक पतसंस्थेत बचाव पॅनलची बाजी

 गेवराई : तालुका शिक्षक पतसंस्थेच्या संचालक पदासाठी रविवारी कन्या प्रशालेमध्ये पार पडलेल्या निवडणुकीत सत्ताधारी प्रगती पॅनलला धक्का देत बचाव पॅनलने १५ पैकी १३ जागा मिळविल्या.
६४३ सभासदांच्या पतसंस्थेत ६२८ जणांनी मतदान केले. त्यानंतर मतमोजणी झाली. सत्ताधारी प्रगती पॅनल व बचाव पॅनलमध्ये थेट सामना झाला. बचाव पॅनलचे महादेव दाभाडे, भगवान फुंदे, भागवत खेडकर, प्रताप कुडके, आण्णासाहेब लोणकर, तात्यासाहेब मेघारे, ज्ञानोबा राठोड, धनंजय सुलाखे, आशा अलगुडे, सुरेश सानप, हौसाबाई बादाडे, विष्णू खेत्रे हे विजयी झाले. ताराचंद कवडे हे आधीच बिनविरोध निवडून आले होते. 
प्रगती पॅनलकडून अर्जुन बारगजे, बाळासाहेब दहिफळे यांनाच विजय मिळविता आला. विजयानंतर जल्लोष करण्यात आला. (वार्ताहर)

Web Title: Rescue panel stand in teacher's cadre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.