५०० कर्मचार्‍यांची बदलीसाठी विनंती

By Admin | Updated: May 15, 2014 00:01 IST2014-05-14T23:10:20+5:302014-05-15T00:01:13+5:30

लातूर : लातूर जिल्हा परिषदेतंर्गत होत असलेल्या सर्वसाधारण बदली प्रक्रियेला आता गती मिळाली आहे़

Request for replacement of 500 employees | ५०० कर्मचार्‍यांची बदलीसाठी विनंती

५०० कर्मचार्‍यांची बदलीसाठी विनंती

 लातूर : लातूर जिल्हा परिषदेतंर्गत होत असलेल्या सर्वसाधारण बदली प्रक्रियेला आता गती मिळाली आहे़ २१, २२, २३ मे असे तीन दिवस चालणार्‍या या प्रक्रियेसाठी सामान्य प्रशासन विभागाने जिल्हा परिषदेतील सर्व विभागांकडून विनंती व प्रशासकीय बदलीसंदर्भात कर्मचार्‍यांचा अहवाल मागवून घेण्यात आला होता़ तो बुधवारी मिळाला असून, साधारणत: ४९७ अधिकारी-कर्मचार्‍यांनी बदलीसाठी विनंती केली आहे़ तर प्रशासकीय बदलीसाठी १४२ जण पात्र ठरले आहेत़ जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन, पंचायत, कृषी, बांधकाम, अर्थ, आरोग्य, लघु पाटबंधारे, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण तसेच शिक्षण विभागात सध्या बदली प्रक्रियेवर काम सुरु आहे़ बुधवारपर्यंत या विभागांनी दिलेल्या संभाव्य अहवालानुसार सर्वाधिक बदल्या शिक्षण विभागात अपेक्षित आहेत़ याठिकाणी प्रशासकीय बदलीस केवळ दोन विस्तार अधिकारीच पात्र ठरले आहेत़ याउलट २५५ सहशिक्षकांनी बदलीसाठी विनंती अर्ज केला आहे़ विनंती अर्जांची सर्वाधिक संख्या सहशिक्षकांचीच आहे़ २५ प्राथमिक पदवीधर, ११ माध्यमिक शिक्षक, ५ केंद्रप्रमुख, २ वरिष्ठ विस्तार अधिकार्‍यांनी विनंती बदली अर्ज केला आहे़ यापाठोपाठ पंचायत विभागात४८ विस्तार अधिकारी प्रशासकीय बदलीस पात्र ठरले आहेत़ तर तितक्याच संख्येने विस्तार अधिकार्‍यांनी विनंतीद्वारे बदली मागितली आहे़ २३ ग्रामसेवक व ५ ग्रामविकास अधिकार्‍यांनीही विनंती केली आहे़ सामान्य प्रशासन विभागातून ४६ कर्मचार्‍यांची प्रशासकीय बदली अपेक्षित आहे तर ४६ कर्मचार्‍यांनी विनंती अर्ज केला आहे़ कृषी विभागातून तिघांची प्रशासकीय तर तिघांनी बदलीसाठी विनंती केली आहे़ बांधकाम विभागातील ११ कर्मचारी प्रशासकीय बदलीस पात्र ठरले आहेत़ तितक्याच संख्येने कर्मचार्‍यांनी विनंती अर्ज केले आहेत़ अर्थ विभागातही प्रत्येकी ७ जणांची हीच अवस्था आहे़ आरोग्य विभागातून एकही कर्मचारी प्रशासकीय बदलीस पात्र नाही़ मात्र २९ कर्मचार्‍यांनी बदलीसाठी विनंती केली आहे़ लघु पाटबंधारे विभागातून चौघे प्रशासकीय बदलीपात्र आहेत़ तर ५ जणांनी बदलीसाठी विनंती अर्ज केला आहे़ पशुसंवर्धन विभागात ११ जणांची प्रशासकीय बदली आहे़ तितक्याच जणांनी विनंती बदलीचा अर्ज केला आहे़ महिला व बालकल्याण विभागात ७ पर्यवेक्षिका बदलीस पात्र आहेत़ ७ जणांनी विनंती बदलीचा अर्ज केला आहे़ एकंदर १४२ कर्मचारी प्रशासकीय बदलीस पात्र ठरले आहेत़ तर ४९७ जणांनी विनंती अर्ज केला आहे़ (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेचे १४२ कर्मचारी जिल्हास्तरीय प्रशासकीय बदलीसाठी पात्र ठरले आहेत़ या कर्मचार्‍यांची नियमानुसार सेवा कालावधी संपल्याने त्यांना सध्याच्या तालुक्यातून दुसर्‍या तालुक्यात जावे लागणार आहे़ त्यामुळे प्रशासकीय बदलीस पात्र ठरलेल्या बहुतेकांनी जवळचा तालुका मिळावा यासाठी विनंती बदलीचा मार्ग स्वीकारला आहे़ विशेष म्हणजे, सामान्य प्रशासन, कृषी, बांधकाम, अर्थ, पशुसंवर्धन, महिला व बाल कल्याण विभागात प्रशासकीय बदलीस पात्र ठरलेल्या कर्मचार्‍यांच्या संख्येएवढेच विनंती बदलीचे अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले आहेत़

Web Title: Request for replacement of 500 employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.