महानगरपालिकेत प्रजासत्ताक दिन साधेपणाने होणार साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:16 IST2021-02-05T04:16:19+5:302021-02-05T04:16:19+5:30

प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता मनपा मुख्यालय येथे ध्वजारोहण होईल. उपग्रह तयार करण्याच्या उपक्रमात सहभागी ...

Republic Day will be celebrated simply in the corporation | महानगरपालिकेत प्रजासत्ताक दिन साधेपणाने होणार साजरा

महानगरपालिकेत प्रजासत्ताक दिन साधेपणाने होणार साजरा

प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता मनपा मुख्यालय येथे ध्वजारोहण होईल. उपग्रह तयार करण्याच्या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी प्रशासकांच्या हस्ते होईल, अशी माहिती सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार यांनी दिली.

---------

महानगरपालिकेत राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

औरंगाबाद : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी सर्व आधिकारी व कर्मचारी यांचा लोकशाही प्रक्रियेमधील सहभाग वाढावा या हेतूने सोमवारी महानगरपालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने यांच्या अध्यक्षतेखाली मतदारासाठींची शपथ घेण्यात आली. नेमाने यांनी शपथेचे वाचन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, मुख्य लेखापरीक्षक दे. का. हिवाळे, निवडणूक विभागाचे आबेद अली, उपअभियंता विद्युत विभाग मोहिनी गायकवाड, अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

------------

महानगरपालिकेतर्फे ऐतिहासिक दरवाजांना उजाळा

औरंगाबाद : ‘एक शोध ५२ दरवाजांचा’ या कलात्मक उपक्रमाद्वारे महानगरपालिकेच्या वतीने ५२ ऐतिहासिक दरवाजांची प्रतिकृती बनविणे स्पर्धेचे आयोजन केले आहे.

सद्य:स्थितीत १८ ऐतिहासिक दरवाजे अस्तित्वात आहेत. यात भडकल गेट, मकाई गेट, बारापुल्ला गेट, महमूद दरवाजा, नौबत दरवाजा, नवखंडा दरवाजा, काला दरवाजा, रंगीन दरवाजा, दिल्ली गेट, कटकट गेट, रोशन गेट, जाफरगेट, पैठणगेटसह टाऊन हॉल, शहागंज येथील ऐतिहासिक घड्याळ यांचा समावेश आहे. हे पूर्वीच्या काळी कसे दिसत होते याचा अभ्यास करून कलाकृतीची साधारण १५ इंच उंची व सम प्रमाणात लांबी व रुंदी या आकारामध्ये हुबेहूब १ प्रतिकृती बनविणे अपेक्षित आहे. कलाप्रेमींनी या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन आपली कलाकृती दि. १५ फेब्रुवारीपर्यंत कलादालन महानगरपालिका येथे सादर करावी, असे आवाहन सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार व कलादालन क्यूरेटर हंसराज बनस्वाल यांनी केले आहे.

Web Title: Republic Day will be celebrated simply in the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.