शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
2
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
3
अमेठी, रायबरेलीत काँग्रेसच्या हाताला सपाच्या सायकलची साथ, अखिलेश यादव यांचे कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश 
4
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
5
Breaking: मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली
6
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
7
UPSC मध्ये घटस्फोटित कोट्यातून नोकरीसाठी पतीला सोडलं, पहिल्याच Marriage Anniversary ला केली विचित्र मागणी
8
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
9
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक
10
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला
11
जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक BMW M 1000 XR लाँच,  जाणून घ्या किंमत...
12
मराठा आरक्षण आंदोलनाचा 'एल्गार', मनोज जरांगे पाटील ४ जूनपासून पुन्हा उपोषण करणार
13
RCB vs CSK सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास प्ले ऑफमध्ये कोण जाणार?
14
घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?
15
Weather Alert: मुंबईत आजही पाऊस लावणार हजेरी; राज्यातील ९ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; असा आहे हवामान अंदाज!
16
शुभकार्यासाठी निघाले होते, पण...; बस-कारच्या धडकेत कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चिमुकला बचावला
17
Women World Cup 2024: भारत वर्ल्ड कपची सेमीफायनल खेळणारच; हरमनने सांगितले तगडे आव्हान
18
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात वाद? हार्दिक सरावाला येताच रोहितसह तिघांनी मैदान सोडले
19
'गलिच्छ! साडी नेसून लोकांच्या मांडीवर बसतो', कपिल शर्मा शोवर भडकला सुनील पाल
20
Video: बापरे..! चिखलात लपलेल्या मगरीने अचानक उघडला जबडा अन् पुढे जे घडलं...

औरंगाबादमधील भूमिगत गटार योजनेचा अहवाल नगरसेवकांना अभ्यासासाठी देणार; वाढत्या विरोधामुळे महापौरांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 1:08 PM

भूमिगत गटार योजना पूर्ण करण्यासाठी ९८ कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास मंगळवारी सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी विरोध केला. त्यामुळे महापौर नंदकुमार घोडेले यांनी योजनेसंदर्भात नगरसेवकांनी उपस्थित केलेले प्रश्न, आतापर्यंत झालेले काम, यापुढे लागणारा निधी आदी मुद्यांवर प्रशासनाकडून सविस्तर अहवाल मागविला आहे. ८ फेब्रुवारीला होणार्‍या सर्वसाधारण सभेपूर्वी अहवाल नगरसेवकांना अभ्यासासाठी देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देभूमिगत गटार योजनेचे ८० टक्के काम झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. उर्वरित २० टक्के काम करण्यासाठी ९८ कोटी रुपयांची गरज असल्याने कर्ज उभारून ही रक्कम कंत्राटदाराला देण्याचा प्रस्ताव

औरंगाबाद : भूमिगत गटार योजना पूर्ण करण्यासाठी ९८ कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास मंगळवारी सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी विरोध केला. त्यामुळे महापौर नंदकुमार घोडेले यांनी योजनेसंदर्भात नगरसेवकांनी उपस्थित केलेले प्रश्न, आतापर्यंत झालेले काम, यापुढे लागणारा निधी आदी मुद्यांवर प्रशासनाकडून सविस्तर अहवाल मागविला आहे. ८ फेब्रुवारीला होणार्‍या सर्वसाधारण सभेपूर्वी अहवाल नगरसेवकांना अभ्यासासाठी देण्यात येणार आहे. या सभेत निर्णय तर होणारच आहे; मात्र निर्णय काय राहील यावर महापौर मौन बाळगून आहेत.

भूमिगत गटार योजनेचे ८० टक्के काम झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. उर्वरित २० टक्के काम करण्यासाठी ९८ कोटी रुपयांची गरज असल्याने कर्ज उभारून ही रक्कम कंत्राटदाराला देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेसमोर सादर केला आहे. २६ डिसेंबरपासून हा प्रस्ताव रखडला आहे. आतापर्यंत तीन वेळेस सभा तहकूब करावी लागली. आता कर्जावर निर्णय घेण्यासाठी ८ फेब्रुवारीचा मुहूर्त शोधण्यात आला आहे.

मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावाला नगरसेवकांनी कडाडून विरोध केला होता. त्यात शिवसेनेचे नगरसेवकदेखील मागे नव्हते. एकीकडे  शिवसेना नेत्याकडून प्रस्ताव मंजूर करण्याचा दबाव, तर दुसरीकडे सेना नगरसेवकांचाच विरोध, अशा कोंडीत सापडलेल्या महापौरांनी शेवटी सभा तहकूब केली. 

दरम्यान, महापौर घोडेले यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना नमूद केले की, नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लेखी स्वरूपात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात मूळ योजना, आतापर्यंत झालेले निर्णय, यापुढे करायची कामे, त्यासाठी लागणारा निधी, महापालिकेच्या मालमत्तांचे बाजार मूल्य किती, आतापर्यंत किती मालमत्ता तारण ठेवण्यात आल्या आहेत, तसेच किती कोटींचे कर्ज महापालिकेने घेतले आहे, सध्याची स्थिती काय, यासह इतर बाबींचा समावेश असेल. पाच फेब्रुवारीपर्यंत अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो सहा रोजी नगरसेवकांना देण्यात येईल. 

१०० कोटींचे कर्ज यापूर्वीही घेतले...शहरात जीटीएल कंपनी असताना महापालिकेवर २०० कोटींची थकबाकी होती. महापालिकेने सेटलमेंट करून शंभर कोटींत विषय संपविण्याची विनंती केली होती. यासाठी महापालिकेने खाजगी बँकेकडून तब्बल १०० कोटींचे कर्ज अनेक मालमत्ता तारण ठेवून घेतले. तेव्हा नगरसेवकांनी एवढा विरोध केला नव्हता. १०० कोटी रुपये भरले नसते तर शहरावर कोणतेच संकट उभे राहिले नसते. आजही महापालिका या कर्जाचे हफ्ते भरत आहे. आज विरोध करणार्‍यांपैकी अनेक नगरसेवक तेव्हा पण सभागृहात होते, अशी आठवणही महापौरांनी करून दिली.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबाद