सावकारी प्रकरणी निबंधकांकडे अहवाल
By Admin | Updated: January 6, 2017 00:18 IST2017-01-06T00:15:12+5:302017-01-06T00:18:51+5:30
लातूर : शहरातील वीर हणमंतवाडी परिसरात श्री साईयोग फायनान्सवर अवैध सावकारी प्रकरणी सहकार विभागाच्या पथकाने छापा टाकला होता़

सावकारी प्रकरणी निबंधकांकडे अहवाल
लातूर : शहरातील वीर हणमंतवाडी परिसरात श्री साईयोग फायनान्सवर अवैध सावकारी प्रकरणी सहकार विभागाच्या पथकाने छापा टाकला होता़ यावेळी ताब्यात घेतलेल्या संशयास्पद कागदपत्रांचा अहवाल पथकाच्या प्रमुखाने सहायक निबंधकाकडे सादर केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली़
वीर हणमंतवाडी येथील विकास कदम यांच्या जबाबावरून गांधी चौक पोलिसांनी श्री साईयोग फायनान्सची चौकशी करण्याबाबत सहकार विभागाला पत्र दिले होते. या प्रकरणी सहकार विभागाच्या पथकाने ३० डिसेंबर रोजी दुपारी पोलीस बंदोबस्तासह वीर हणमंतवाडी येथील साईयोग फायनान्स आणि घराची झाडाझडती घेतली़
यावेळी एक वही व श्री साईयोग फायनान्सच्या नावाने कोरे धनादेश आणि मुद्रांक आढळून आले़ जवळपास १६ जणांच्या नावाने दिलेले कर्ज आणि पासबुक अशी कागदपत्रे पथकाने जप्त केली. १ सप्टेंबर २००६ या तारखेच्या नोंदी वहीत आहेत़ सहायक निबंधकाकडे सादर केलेल्या अहवालात राजकुमार ऊर्फ हनुमंत किशन पिटले हे अवैध सावकारी करीत असल्याचे म्हटले आहे़ त्यांच्यावर अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात यावी, असेही शिंदे यांनी अहवालात म्हटले आहे.