तलाठ्याने बनविलेला अहवाल शंकास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:06 IST2021-06-16T04:06:41+5:302021-06-16T04:06:41+5:30
वैजापूर : तालुक्यातील हिलालपूर-कोरडगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचाने शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले आहे. मात्र, तलाठ्याने चुकीचा अहवाल दिल्याने सरपंचावरील कारवाई ...

तलाठ्याने बनविलेला अहवाल शंकास्पद
वैजापूर : तालुक्यातील हिलालपूर-कोरडगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचाने शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले आहे. मात्र, तलाठ्याने चुकीचा अहवाल दिल्याने सरपंचावरील कारवाई रखडली असल्याचा आरोप राजेंद्र नारायण कटारे या नागरिकाने केला आहे.
हिलालपूर कोरडगावच्या सरपंचाने गट नंबर ४ मधील जमिनीवर अतिक्रमण करून या गटात त्यांनी शेततळे व घर बांधले आहे. या संदर्भात राजेंद्र कटारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून सरपंचाचे पद रद्द करण्याची मागणी केली आहे. या जागेचा पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे आदेश हिलालपूरचे तलाठी एम. टी. खिल्लारी यांना देण्यात आले होते. मात्र, तलाठ्यांनी सदर शासकीय जमिनीवर न जाता अहवाल बनविला असून, तो चुकीचा व संशयास्पद असल्याचा आरोप कटारे यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात दुसऱ्या अधिकाऱ्यांमार्फत जागेवर जाऊन पंचनामा करावा, अशी मागणी राजेंद्र कटारे यांनी तहसीलदारांकडे केली आहे.