धरणातील मृत माशांचा अहवाल गुलदस्त्यात
By Admin | Updated: July 1, 2017 00:35 IST2017-07-01T00:35:11+5:302017-07-01T00:35:51+5:30
बीड : माजलगाव धरणात महिन्यापूर्वी हजारो मासे मरून काठावर येऊन पडले होते. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती;

धरणातील मृत माशांचा अहवाल गुलदस्त्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : माजलगाव धरणात महिन्यापूर्वी हजारो मासे मरून काठावर येऊन पडले होते. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती; परंतु हे मासे कशामुळे मेले, याचा अहवाल अद्यापही संबंधित ठेकेदाराने सहायक आयुक्त, मत्स्य व्यवसाय कार्यालयाकडे पाठविला नाही. अहवाल पाठविण्यास ठेकेदार उदासिन आहे तर अधिकारी त्याची ठेकेदाराची पाठराखण करीत असल्याचे दिसून येत आहे.
माजलगाव धरणातून बीड, माजलगाव शहरासह ११ खेड्यांना पाणीपुरवठा केला जातो. या धरणात मत्स्य व्यवसायही तेजीत चालतो. राज्याच्या कानाकोपऱ्यात येथील मत्स्य विक्रीस जाते. परंतु मागील महिन्यात या धरणातील मासे अचानक मरू लागल्याचे समोर आले होते. तीन दिवस सलग हे मासे मरत असल्याने पाणीही दूषित झाले होते. तसेच हे मासे खाल्ल्याने मोकाट कुत्र्यांचाही मृत्यू झाला होता.
त्यानंतर बीड, माजलगाव शहरासह ११ खेड्यांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नगर पालिका प्रशासनानेही याचे नमुने तपासणीसाठी घेणार असल्याचे सांगितले होते. परंतु अद्याप त्यांनी यावर काहीच कार्यवाही केली नसल्याचे दिसते.