शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जशास तसे उत्तर! जरांगेंचा एल्गार, १९९४ च्या ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणार

By बापू सोळुंके | Updated: October 7, 2025 13:56 IST

प्रक्षोभक नाही, मी मराठ्यांच्या व्यथा मांडल्या! जरांगेंचा भुजबळ आणि तायवाडे यांच्या मागणीला पलटवार

छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाला आजपर्यंत तीवेळा आरक्षण मिळाले, प्रत्येकवेळी आमच्या आरक्षणाविरोधात जाऊन आरक्षण रद्द केले. सध्याच्या १० टक्के आरक्षणाविरोधात तसेच २ सप्टेंबरच्या जी.आर. विरोधात ओबीसी नेत्यांनी याचिका दाखल केल्या आहेत. यामुळे आम्हीही त्यांना जशास तसे उत्तर देण्याचे ठरवले आहे. यासाठी ओबीसींना मिळालेल्या १९९४ सालच्या आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणार असल्याचे मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

शहरातील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनोज जरांगे यांनी मंगळवारी (दि.७) पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मराठा समाज मोठ्या संघर्षातून आरक्षण मिळवत आला आहे. आमच्या गरीबांची मुलं शिकले नाही पाहिजे, ते मोठी होवू नये, यासाठी आमच्या आरक्षणाविरोधात याचिका दाखल करण्यात आल्या.नारायण राणे यांनी दिलेले आरक्षण घालवले, फडणवीस यांनी दिलेल्या सन २०१८ मधील आरक्षण घालवले. आता गतवर्षी दिलेल्या आरक्षणाविरोधातही याचिका दाखल करण्यात आल्या. एवढेच नव्हे तर आमच्या जी.आर. विरोधातही त्यांनी याचिका दाखल केल्या. मंत्री छगन भुजबळ यांनी सात याचिका दाखल केल्याचे जाहिर सांगितले आहे. आम्ही तुमच्या आरक्षणाविरोधात कधी याचिका दाखल केल्या नाही. तरीही तुम्ही मराठ्यांच्या विरोधात जात आहात, म्हणून आम्ही हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. ओबीसी नेत्यांना जशास तसे उत्तर देण्याचे ठरवले आहे. यासाठी पुढील आठवड्यात दिल्लीला आणि नंतर मुंबईला जाणार आहे. तेथे विधीज्ञांशी बोलून १९९४च्या ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल करण्यासंदर्भात बैठक घेणार असल्याचे जरांगे म्हणाले.

मी प्रक्षोभक बोलत नाही! ओबीसी नेते तायवाडे यांनी तुमच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, याकडे लक्ष वेधले असता जरांगे म्हणाले की, मी कुठं प्रक्षोभक बोलतो. आम्ही शांततेत आंदोलन करीत होतो, तेव्हा  छगन भुजबळ यांनी अंबड येथे येऊन काेयत्याची भाषा केली होती. तेव्हा त्यांच्यावर  गुन्हा दाखल करा अशी मागणी का केली नाही? मी भडखाऊ भाषण केले नाही, मी मराठ्यांच्या व्यथा मांडल्या. उलट त्यांनी जातीयवाद केला. त्यांना आतून मराठ्यांना संपवायचे आहे, त्यासाठी 'माधव' पॅटर्न त्यांनी आणला होता,असे ते म्हणाले. तुम्ही जातीयवाद  केला म्हणून तुमच्यावर गुन्हे दाखल होतात, असेही त्यांनी सांगितले.

आम्ही सोडणार नाहीमराठ्यांना आरक्षण देऊ नये, असे काँग्रेसवाले का बोलत आहे. आमच्यावर बोलला तर आम्ही सोडणार नाही, असा इशारा त्यांनी विजय वडेट्टिवार यांना दिला. काँग्रेसने दलित, मुस्लिमांना वाऱ्यावर सोडून दिले. या दोन्ही समाजाविषयी ते काहीच बोलत नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Tit-for-Tat: Jarange to Challenge 1994 OBC Reservation After Petitions Filed

Web Summary : Manoj Jarange Patil vows to challenge the 1994 OBC reservation in response to petitions against Maratha quota. He accuses OBC leaders of hindering Maratha progress and plans legal action in Delhi and Mumbai after earlier Maratha reservations were challenged in court.
टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षणChhagan Bhujbalछगन भुजबळVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार