१ लाख २० हजार भूधारकांनाही भरपाई

By Admin | Updated: March 18, 2015 00:20 IST2015-03-18T00:01:16+5:302015-03-18T00:20:25+5:30

बीड: गत आठवड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने फटका दिल्याने रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. त्या अनुषंगाने दोन हेक्टरपेक्

Replacement of 1 lakh 20 thousand landowners | १ लाख २० हजार भूधारकांनाही भरपाई

१ लाख २० हजार भूधारकांनाही भरपाई


बीड: गत आठवड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने फटका दिल्याने रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. त्या अनुषंगाने दोन हेक्टरपेक्षा अधिक जमिन असणाऱ्या शेतकऱ्यांना आता एक हेक्टर मर्यादेपर्यंत मदत मिळणार असल्याचे प्रशासनाने जाहिर केले आहे.
मध्यंतरी रबीच्या पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला होता. त्यामुळे ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. प्राथमिक स्वरूपात अल्पभूधारक शेतकऱ्यांच्याच पिकाचे पंचानामे करून अहवाल मागविण्यात आला होता.मात्र अवकाळीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे भुधारक शेतकऱ्यांनाही एक हेक्टरपर्यंतच्या क्षेत्रातील नुकसान भरपाई मिळणार आहे. जिल्ह्यात ६ लाख ५१ हजार ७८३ शेतकऱ्यांची संख्या आहे. यामध्ये ५ लाख ९३६ अल्पभुधारक तर १ लाख २० हजार ८४७ शेतकरी भुधारक आहेत. जिल्ह्यातील १ लाख २० हजार ८४७ भुधारक शेतकऱ्यांच्या पिकांचेही पंचनामे करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने आठ दिवसात प्रशासनाला सर्वकश माहिती देण्यात येणार आहे.
पंधरा दिवसांत दोन वेळा झालेल्या अवकाळीमुळे वाढीला लागलेली पिके बाधित झाली आहेत. प्रारंभी जवळपास ६५ कोटी रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसणार असे ग्राह्य धरण्यात आले होते. पंचनामे केल्यानंतर एकंदरीत किती नुकसान झाले आहे याची माहिती समोर येईल. (प्रतिनिधी)

Web Title: Replacement of 1 lakh 20 thousand landowners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.