‘एमआयएम’ मुळे संजयनगरात पुन्हा वाद
By Admin | Updated: March 28, 2015 00:47 IST2015-03-28T00:27:40+5:302015-03-28T00:47:49+5:30
औरंगाबाद : एमआयएमचे जिल्हाध्यक्ष जावेद कुरैशी यांनी शुक्रवारी रात्री संजयनगरात कॉर्नर मीटिंग घेतल्याच्या कारणावरून परिसरात दोन गटांत वाद झाला.

‘एमआयएम’ मुळे संजयनगरात पुन्हा वाद
औरंगाबाद : एमआयएमचे जिल्हाध्यक्ष जावेद कुरैशी यांनी शुक्रवारी रात्री संजयनगरात कॉर्नर मीटिंग घेतल्याच्या कारणावरून परिसरात दोन गटांत वाद झाला. कुरैशी यांना नागरिकांनी घेरून रोखून ठेवले होते. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने त्यांना संजयनगरातून सुखरूप बाहेर पडता आले.
पोलिसांनी सांगितले की, सायंकाळी सात वाजता कुरैशी हे संजयनगरातील गल्ली नंबर ९ येथे काही कार्यकर्त्यांसह आले. तेथेच त्यांनी अलीम शेख यांच्या घरासमोर मीटिंग सुरू केली. कुरैशी व एमआयएमचे कार्यकर्ते आचारसंहिता असतानाही अनधिकृतरीत्या मीटिंग घेत असल्याची माहिती कळताच विरोधी गट तेथे पोहोचला. दोन्ही गट आमनेसामने आले. विरोधी गटाने त्यांना घेरले. तेथेच रोखून ठेवले. घटनेची माहिती मिळताच जिन्सी ठाण्याचे निरीक्षक शिवाजी कांबळे हे मोठा फौजफाटा येऊन तेथे पोहोचले.