रेणुका माता संस्थान झाले कोट्याधीश
By Admin | Updated: May 23, 2014 01:11 IST2014-05-23T00:33:27+5:302014-05-23T01:11:28+5:30
इलियास बावाणी , माहूर श्री रेणुका माता मंदिर संस्थानवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने स्थापन त्रिसदस्यीय समितीने न्यायालयाने ठरवून दिलेल्या नियमानुसार सुरक्षा सुविधाकडे विशेष लक्ष दिल्ने
रेणुका माता संस्थान झाले कोट्याधीश
इलियास बावाणी , माहूर येथील श्री रेणुका माता मंदिर संस्थानवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने स्थापन झालेलया त्रिसदस्यीय समितीने न्यायालयाने ठरवून दिलेल्या नियमानुसार देवस्थानावर भाविक भक्तांची सुरक्षा सुविधाकडे विशेष लक्ष दिल्याने भाविकांच्या संख्येत वाढ होवून देणगी, पातळ साड्या विक्री व इतर उत्पन्न स्त्रोतांअधारे मंदिराच्या खात्यात सव्वा कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे़ श्रीक्षेत्र माहूर शहरातील गढावर अनेक देवस्थाने असून येथे वर्षभर भाविक पर्यटकांची सतत वर्दळ असते़ त्यातल्या त्यात येथे भरणार्या यात्रात येणार्या भाविकांची संख्या लाखोंच्या घरात असल्याने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी गडावर जाणारे रस्ते, भक्तांसाठी सुविधा, अद्ययावत यात्रीनिवास, पार्कींग व इतर सुविधांसाठी ७९ कोटी रुपये मंजूर केल्याने आज शहर व गडावर भाविकांना दर्शनासाठी कुठलीच अडचण येणार नाही़ श्री रेणुकामाता मंदिरावर गेल्या आठ महिन्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात येवून त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली़ यात प्रशासक तथा सदस्य म्हणून उपविभागीय अधिकारी अभिजित चौधरी, विनायकराव फांदाडे, भवानीदास भोपी यांची नियुक्ती कारभार पाहण्यासाठी करण्यात आली़ समितीने भाविकांच्या सोयी सुविधांना प्राधान्य देत मंदिरावर जाणार्या पायर्यांवर कचरापेट्या, आरामदायक, बेंच, पायर्यावर एलसीडी टीव्ही, सीसी टीव्ही कॅमेरे, ठिकठिकाणी पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था तसेच वृद्ध भाविकांना पायर्याखालून वर मंदिरात आणण्यासाठी डोलीची व्यवस्था व त्यांचे दर निश्चित करून दिले़ तसेच मंदिराच्या दक्षिण बाजूस गार्डन बनविण्याच्या कामासही सुरुवात करण्यात आली आहे़ मंदिरात शेड नसलेल्या ठिकाणी फरशीवर उष्णतारोधक कलर करण्यात आल्याने उन्हात उभे राहिल्यास भक्तांचे पाय पोळणार नाहीत, अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे़ येण्याजाण्याचे मार्गही प्रशस्त करण्यात आले असून ना नफा ना तोटा या तत्वावर नाव देवीचा मुख्य प्रसाद तांबुल व प्रसाद विक्री केंद्रासह गडावर तथा शहरात देवीच्या साड्या व पातळ विक्री केंद्रही सुरु करण्यात आले आहे़ भाविकांना सोवळे परिधान करण्यासाठी खोली तयार करण्यात आली आहे़ परशुराम मंदिराकडे जाणार्या पायर्यावर उष्णतारोधक कटलरींग तसेच शेड बनविण्यात आले असून संपूर्ण मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून मंदिर उघडण्याची व बंद होण्याची वेळ मुख्य प्रवेशद्वारावर लिहिण्यात आली असून मंदिर प्रशासन भाविकांच्या सोयी सुविधांकडे पूर्ण लक्ष देत असून सूचना असल्यास भाविकांनी मंदिरात असलेल्या कार्यालयात द्याव्यात़ मंदिराच्या पायथ्याशी भाविकांच्या आरोग्यविषयक समस्या लक्षात घेवून अद्ययावत आरोग्य सेवा केंद्र सुरू करण्यात आले असून येथे तज्ञ डॉ़राम कदम यांच्यासह परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली असून आरोग्य समस्या उद्भवल्यास भाविकांना तेथे तत्काळ उपचार मिळण्याची सुविधा करण्यात आली आहे़ भाविकांच्या सुरक्षेकरिता मुख्य सुरक्षा अधिकार्यांसह सुरक्षा कर्मचारी, सुरक्षा रक्षक, महिला सुरक्षा रक्षकासह स्वच्छतेसाठी वृद्ध भाविकांना मदत करण्यासाठी सेवकांची नियुक्ती करण्यात आली असून वीजपुरवठा बंद झाल्यास क्षणात विद्युत पुरवठा चालू होईल असे अद्ययावत जनरेटर इन्व्हर्टर बसविण्यात आले. सुरक्षा रक्षकाच्या हाती वॉकीटॉकी देण्यात येणार आहे़ शासनाने मंदिरासाठी बनविलेली नळयोजना सुरळीतपणे सुरू असून मंदिरावर भरपूर मुबलक पाणी उपलब्ध रहावे यासाठी टेस्टींग चालू असून ४ कोटी रुपये खर्चून बनविण्यात आलेली ही नळयोजना एका महिन्यानंतर मंदिर प्रशासन मंडळ ही नळयोजना परवानगीनंतर ताब्यात घेणार असल्याने येथील पाण्याचा प्रश्न कायम निकाली निघणार आहे़ मंदिरावरील पातळ साड्या विक्री केंद्र, शहरातील साड्या व पातळी विक्री केंद्र, तांबूल, विक्री केंद्र व भाविकांना देणगी देण्यासाठी आॅनलाईन सुरू करण्यात आलेले अकाऊंटस् यामुळे मंदिराच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे़