शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सुसाट कारच्या धडकेत प्रख्यात प्राध्यापक डॉ. राम माने यांचा पत्नीसह हृदयद्रावक मृत्यू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 23:38 IST

विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, न्यायनिष्ठ वकील दांपत्याच्या मृत्यूने शैक्षणिक, न्याय व सामाजिक क्षेत्रात शोककळा

छत्रपती संभाजीनगर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रसायनशास्त्राचे ज्येष्ठ संशोधक, सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. रामराव आत्माराम माने (वय ७३) आणि त्यांची पत्नी, हायकोर्टातील निष्ठावान व वरिष्ठ वकील ॲड. रत्नमाला साळुंके-माने (वय ६५) यांचा एका भीषण अपघातात जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना शनिवारी (दि. २५) सायंकाळी पडेगाव येथील आर्च आंगणसमोर घडली आहे.

माने दांपत्य रस्ता ओलांडत असताना, भरधाव वेगाने आलेल्या एका अनियंत्रित कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, या आदर्श दांपत्याचा जागीच अंत झाला. या अकस्मात आणि चटका लावणाऱ्या निधनाने शैक्षणिक, न्याय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

डॉ. राम माने: संशोधक ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापकडॉ. रामराव माने यांनी १९८० ते २०२४ या प्रदीर्घ काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या अध्यापनशैलीतील विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता आणि विषयावरील सखोल ज्ञान यामुळे ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून ओळखले जात. * संशोधनाचे योगदान: अनेक पेटंट त्यांच्या नावावर असून, ते देशभरातील नामांकित संशोधकांपैकी एक होते. * शैक्षणिक धोरण: राज्याच्या शैक्षणिक धोरण समिती सदस्य असताना त्यांनी अमूल्य योगदान दिले होते. * प्रशासन: २००६ ते २०१० दरम्यान ते विद्यापीठाच्या अधिसभा व व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून कार्यरत होते. * धाराशिव उपपरिसर: विद्यापीठाच्या धाराशिव (उस्मानाबाद) उपपरिसर उभारणीमध्ये त्यांचा मोठा वाटा होता.

ॲड. रत्नमाला माने: समाजनिष्ठ, आदर्श वकीलॲड. रत्नमाला साळुंके-माने यांनी गेल्या तीन दशकांहून अधिक काळ हायकोर्टात यशस्वी वकिली केली. प्रामाणिकपणा, तळमळ आणि सामाजिक जाणीव यामुळे त्या वकिलांमध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जात होत्या.

असंख्य विद्यार्थ्यांवर शोककळामाने दांपत्यास अपत्य नव्हते, परंतु त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना आपल्या पाल्याप्रमाणे जपले, मार्गदर्शन केले आणि त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा दिली. त्यांचे घर नेहमीच विद्यार्थ्यांसाठी खुले असायचे. त्यामुळे, त्यांच्या या अपघाती निधनाने केवळ कुटुंबातच नव्हे, तर त्यांच्या हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. विद्यापीठातील प्राध्यापक आणि शेकडो विद्यार्थ्यांवर यामुळे शोककळा पसरली आहे.

मूळगावी होणार अंत्यसंस्कार:

माने दांपत्याचा पार्थिव रविवारी (दि. २६) धाराशिव जिल्ह्यातील त्यांच्या मूळगावी रुईभर येथे नेण्यात येणार असून, तेथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Professor, Wife Tragically Killed in Car Accident; Community Mourns

Web Summary : Professor Ram Mane and his wife, Advocate Ratnamala Salunke-Mane, died instantly in a car accident near Chhatrapati Sambhajinagar. The couple's sudden death has cast a pall of gloom over academic, legal, and social circles. Their funeral will be held in their hometown, Rui Bhar.
टॅग्स :Accidentअपघातchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर