शहर स्वच्छतेच्या अडचणी झाल्या दूर

By Admin | Updated: September 3, 2014 00:03 IST2014-09-02T23:45:31+5:302014-09-03T00:03:49+5:30

परभणी : शहर महानगरपालिकेने ४ लाख रुपये खर्चून स्वच्छतेचे साहित्य खरेदी केले असल्याने आता शहर स्वच्छतेला गती येईल,

Removed by the problems of cleanliness in the city | शहर स्वच्छतेच्या अडचणी झाल्या दूर

शहर स्वच्छतेच्या अडचणी झाल्या दूर

परभणी : शहर महानगरपालिकेने ४ लाख रुपये खर्चून स्वच्छतेचे साहित्य खरेदी केले असल्याने आता शहर स्वच्छतेला गती येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
परभणी महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर शहर स्वच्छता व इतर कामे ढेपाळली होती. शहराला बकाल स्वरुप प्राप्त झाले होते. त्यामुळे स्वच्छतेसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात ओरड होत होती. त्यातच महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचे चार ते सहा महिन्यांचे पगारही थकले होते. त्यामुळे स्वच्छतेची कामे वेळेवर होत नव्हती. स्वच्छतेसाठी खोरे, टोपले, नाल्या काढण्यासाठी लांब खोरे आदी साहित्याची आवश्यकता असते. परंतु दोन वर्षांपासून महानगरपालिकेत या साहित्याचाही तुटवडा जाणवत होता. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती.
दरम्यान, मनपाने नुकतेच स्वच्छतेसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी केली आहे. ४ लाख रुपयांचे साहित्य खरेदी करण्यात आले. त्यात शहर स्वच्छतेसाठी ३ लाख ९० हजार रुपयांचे तर उद्यान विभागासाठी ३० हजार रुपयांचे साहित्य खरेदी करण्यात आले. २०१२ पासून कर्मचाऱ्यांना जाणवणारी अडचण साहित्य खरेदीमुळे दूर झाली आहे. त्याचप्रमाणे मनपा कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्नही आता निकाली निघाला आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छतेच्या कामांना गती येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
गुलमीर खान यांच्या हस्ते वाटप
महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागामार्फत २ सप्टेंबर रोजी आरोग्य व स्वच्छता सभापती गुलमीर खान यांच्या हस्ते कामगारांना साहित्याचे वाटप करण्यात आले.
४याप्रसंगी नगरसेवक गणेश देशमुख, सुनील देशमुख, युनूस सरवर, सुशील नर्सीकर, गोविंद पारडकर, प्रभाग समिती प्रमुख सय्यद इम्रान, स्वच्छता विभाग प्रमुख करण गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
४सभापती गुलमीर खान म्हणाले, साहित्य नसल्याने साफसफाई होत नव्हती. पगारही वेळेवर नसल्याने कर्मचाऱ्यांत असंतोष होता. आता महाराष्ट्र शासनाने पगारापोटी १०० टक्के अनुदान मंजूर केले आहे. तसेच सफाईसाठी साहित्यही उपलब्ध झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सणासुदीच्या दिवसांत स्वच्छतेवर भर द्यावा. स्वच्छता निरीक्षकांनीही आपल्या प्रभागात स्वच्छता करुन घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

Web Title: Removed by the problems of cleanliness in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.