शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

डांबराचे थर काढा अन्यथा मकई गेटचा पुल कोसळेल; ऐतिहासिक वारसा अनागोंदीचा शिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 15:03 IST

किमान ३५० वर्षांपासून हा पूल शहरवासीयांचा भार सांभाळत ताठ मानेने उभा आहे. मात्र, त्याच्या देखभाल, दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे

- शेख मुनिरछत्रपती संभाजीनगर : जवळपास ३५० वर्षांपूर्वी बांधलेला ऐतिहासिक मकई दरवाजा व पुलाकडे होणाऱ्या अक्षम्य दुर्लक्षामुळे तो कोसळण्याच्या मार्गावर आहे. वारंवार डांबरीकरणाचे थरावर थर चढवून पुलावर प्रचंड भार वाढला आहे. ते डांबराचे थर काढल्याशिवाय त्या पुलावर सिमेंट काॅंक्रीटीकरण करण्यास भारतीय पुरातत्त्व विभागाने मनाई केली असल्याने या रस्त्याचे काम रखडले आहे.

ऐतिहासिक मकाई गेट आणि पुलाचे बांधकाम १६८० ते १६८३ या काळात करण्यात आले. किमान ३५० वर्षांपासून हा पूल शहरवासीयांचा भार सांभाळत ताठ मानेने उभा आहे. मात्र, त्याच्या देखभाल, दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने या पुलाच्या भिंतीवर मोठमोठी झाडे उगवली आहेत. शिवाय पुलावरून मोठी जलवाहिनी टाकण्यात आली. या जुन्या पुलावरून १६ टायरचे अवजड ट्रक मालवाहतूक करतात. पुलावर वेळोवेळी डांबरीकरण केल्याने रोडची जाडी आणि वजन खूप वाढल्याने या पुलाला धोका निर्माण झाला आहे. सध्या येथे सुरू असलेले सिमेंट काॅंक्रीट टाकण्याचे काम भारतीय पुरातत्व विभागाने थांबविले आहे. या पुलावर डांबराचे चढविलेले थरावर थर काढून त्यावरील वजन कमी करा, अशी पूर्वअट पुरातत्त्व विभागाने घातली आहे. त्याचबरोबर दिल्ली गेटप्रमाणे गेटच्या दुतर्फा रस्ता तयार करून या गेटचे सौंदर्यीकरण करावे आणि आतून होणारी वाहतूक बंद करावी, असा दुसरा पर्यायही विभागाने सुचविला आहे.

हा ऐतिहासिक दरवाजा पाहण्यासाठी पर्यटक येतात. मात्र, पर्यटक व त्यांची वाहने थांबण्यासाठी येथे जागाच नाही. त्यामुळे पर्यटकांना धावत्या वाहनातूनच गेट पाहावे लागते. गेटच्या दोन्ही बाजूची जागा पुरातत्व विभागाने आपल्या ताब्यात घेतली असून, त्यावर कुंपण टाकण्याचे काम सुरू आहे. गेटच्या बाजूला टाकण्यात आलेली मोठी केबलही काढण्यात येणार आहे. यानंतर कोणालाही केबल किंवा इतर कोणतेही काम करण्यास परवानगी मिळणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोजकेच ऐतिहासिक दरवाजे शिल्लकआपल्या या ऐतिहासिक वारशाचे संगोपन व देखभालीसाठी शहरातील नागरिक पुढे आले तर हे स्मारक सुंदर करण्याची आमची तयारी आहे. या गेटवर विद्युत रोषणाई व कारंजे, संगीत आदी वेगवेगळे उपक्रम राबविले जाऊ शकतात. शहरात काही मोजकेच ऐतिहासिक दरवाजे शिल्लक राहिले आहेत. याकडे आम्ही दुर्लक्ष केले तर हे सुद्धा लवकरच धाराशाही होतील.- अनिल गोटे, सहसंचालक, भारतीय पुरातत्त्व विभाग

टॅग्स :AurangabadऔरंगाबादArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणtourismपर्यटन