घनसावंगीतील सिंचनाचा अनुशेष झाला दूर
By Admin | Updated: September 28, 2014 00:41 IST2014-09-28T00:24:16+5:302014-09-28T00:41:01+5:30
अंबड : गोदावरी नदी म्हणजे घनसावंगी विधानसभा मतदारसंघाला लाभलेले दैवी वरदान आहे. मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी जास्तीस जास्त शेतजमीन सिंचनाखाली यावी

घनसावंगीतील सिंचनाचा अनुशेष झाला दूर
अंबड : गोदावरी नदी म्हणजे घनसावंगी विधानसभा मतदारसंघाला लाभलेले दैवी वरदान आहे. मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी जास्तीस जास्त शेतजमीन सिंचनाखाली यावी हा दृष्टीकोनसमोर ठेवून पालकमंत्री राजेश टोपे यांनी सिंचनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याचा दावा, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख यांनी केला.
मतदारसंघाच्या विकासासाठी पालकमंत्री टोपे यांच्या प्रयत्नातून घनसावंगी या एकाच मतदारसंघात ४ बॅरेजेस व २ कोल्हापुरी बंधाऱ्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. जमिनीवर पडलेल्या पावसाचा थेंब ना थेंब अडवून दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी टोपे यांनी स्थानिक स्तर, कृषी विभाग, एमकेसीएल आदी विभागातंर्गत मतदारसंघातील बहुतांश कोल्हापुरी बंधारे व साखळी बंधारे मंजुर करुन घेतले. यातील काही बंधाऱ्यांचे काम पुर्ण झाले असुन काहींचे काम प्रगतीपथावर असल्याचे ते म्हणाले. जमिनीतील पाणी पातळीत वाढ होऊन कायमस्वरुपी पाणी टंचाई दुर होईल, असे नमूद केले. सर्वात महत्वाचे जलस्त्रोत म्हणजे गोदावरी नदी व जायकवाडी धरणाचे पाणी होय. पालकमंत्री टोपे यांनी गोदावरी नदीवर २००४ ते २००९ या कालखंडात सुरु केलेले बॅरेजेसचे काम त्यांनी २००९ ते २०१४ या कार्यकाळात पुर्ण करुन मतदारांना दिलेला शब्द खरा केला, असेही ते म्हणाले. घनसावंगीत चार बॅरेजेसचे काम पुर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे तब्बल ४ हजार ८३५ हेक्टर शेतजमीन ओलिताखाली आली आहे. जोगलादेवी उच्च पातळी बॅरेजेसची पाणी साठवण क्षमता १० दसलक्ष घनमीटर आहे. त्यामुळे जोगलादेवी, साडेगाव, गंगाचिंचोली, कोठाळा खुर्द, हसनापुर, गोंदी, पाथरवाला बु. या क्षेत्रातील तब्बल ५७० हेक्टर शेतजमीन ओलिताखाली आली. (प्रतिनिधी)
मंगरुळ निम्न प्रकल्पाने २५ दसलक्ष घनमीटर पाणीसाठा व जवळपास १ हजार ८४० हेक्टर शेतजमीन ओलिताखाली, राजाटाकळीमुळे २५ दसलक्ष घनमीटर पाणीसाठा, १ हजार ८२५ हेक्टर शेतजमीन ओलिताखाली, लोणीसावंगीमुळे ६०० हेक्टर शेतजमीन ओलिताखाली आल्याचे देशमुख म्हणाले.
स्थानिक स्तर, कृषी विभाग, एमकेसीएल आदी विभागाच्या माध्यमातून आपण ५० गावांमध्ये २६ कोटी ९१ लाख ६७ हजार रुपयांचे कोल्हापुरी बधांरे व साखळी बंधाऱ्यांची कामे तडीस नेली. भविष्यातसुध्दा उर्वरित क्षेत्र ओलिताखाली यावे म्हणून प्रयत्न करणार आहोत, असे पालकमंत्री टोपे यांनी म्हटले.