धार्मिक स्थळाजवळील अतिक्रमणे काढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 00:44 IST2017-08-08T00:44:23+5:302017-08-08T00:44:23+5:30
पैठणगेट भागातील रॉक्सी चित्रपट गृहाजवळील धार्मिक स्थळ काढण्यासाठी महापालिकेचे पथक सोमवारी दुपारी १ वाजता दाखल झाले. या पथकाने धार्मिक स्थळाच्या दोन्ही बाजूने व्यापाºयांनी केलेले अतिक्रमण काढले.

धार्मिक स्थळाजवळील अतिक्रमणे काढली
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पैठणगेट भागातील रॉक्सी चित्रपट गृहाजवळील धार्मिक स्थळ काढण्यासाठी महापालिकेचे पथक सोमवारी दुपारी १ वाजता दाखल झाले. या पथकाने धार्मिक स्थळाच्या दोन्ही बाजूने व्यापाºयांनी केलेले अतिक्रमण काढले. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. रस्ता १०० फूट मोकळा करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. मनपाच्या दुसºया एका पथकाने मध्यवर्ती जकात नाका परिसरातील एक दर्गा काढणे सुरू केले. भाविकांनी स्वत:हून दर्गा काढून घेण्याचे आश्वासन दिल्यावर मनपाने कारवाई थांबविली.
खंडपीठाच्या आदेशानुसार मागील काही दिवसांपासून महापालिकेने धार्मिक स्थळ हटविण्याची कारवाई सुरू केली आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख एम.बी. काझी पथकासह अल्तमश कॉलनी, मध्यवर्ती जकात नाका येथे दाखल झाले. तेथील दुर्राणी शहा यांचा दर्गा मनपाच्या खुल्या जागेवर उभारण्यात आला आहे. दर्गा काढण्यासाठी मनपाच्या जेसीबीने कामही सुरू केले. याचवेळी दर्गा समिती आणि परिसरातील काही तरुण मोठ्या संख्येने दाखल झाले. त्यांनी कारवाईला कडाडून विरोध दर्शविला. दर्गासमोर बसून तरुणांनी महापालिकेच्या विरोधात जोरजोरात घोषणाबाजी सुरू केली. एम. बी. काझी आणि उपअभियंता ए.बी. देशमुख यांनी त्यांची समजूत घातली. यावेळी मनपा अधिकाºयांच्या विरोधातही नागरिकांनी अपशब्दांचा वापर केला. तब्बल अडीच तास या भागात तणाव निर्माण झाला होता. शेवटी आम्ही स्वत:हून दर्गा काढून घेऊ, असे लेखी आश्वासन दर्गा कमिटीने दिले. दर्गाच्या वरील पत्रे काढल्यानंतरच महापालिकेचे पथक परतले. मनपाच्या तिसºया पथकाने शहाबाजार येथील दर्गा काढली.
महापालिकेचे उपायुक्त अय्युब खान, सहायक नगररचनाकार जयंत खरवडकर यांच्या नेतृत्वाखालील पथक दुपारी १ वाजता पैठणगेट भागात दाखल झाले. रॉक्सी चित्रपटगृहाजवळील १८ दुकानांचे अतिक्रमण काढून रस्ता १00 फूट मोकळा केला.