ट्रामा केअर युनिटचे लोकार्पण

By Admin | Updated: July 22, 2014 00:37 IST2014-07-22T00:25:25+5:302014-07-22T00:37:15+5:30

सिल्लोड : सिल्लोड येथे उभारण्यात आलेल्या ट्रामा केअर सेंटरचे लोकार्पण, विशेष शिशु-बालसंगोपन व महिला विशेष रुग्णालयाचे भूमिपूजन सुरेश शेट्टी यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.

Remembrance of Trauma Care Unit | ट्रामा केअर युनिटचे लोकार्पण

ट्रामा केअर युनिटचे लोकार्पण

सिल्लोड : सिल्लोड येथे उभारण्यात आलेल्या ट्रामा केअर सेंटरचे लोकार्पण, विशेष शिशु-बालसंगोपन व महिला विशेष रुग्णालयाचे भूमिपूजन सुरेश शेट्टी यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.
यावेळी सुरेश शेट्टी आणि अब्दुल सत्तार यांची समयोचित भाषणे झाली. दोघांनीही राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने सिल्लोड मतदारसंघासाठी केलेल्या विकास कामाचा आपल्या भाषणातून आवर्जून उल्लेख केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अब्दुल सत्तार हे होते. कार्यक्रमाला जि. प. चे माजी अध्यक्ष प्रभाकर पालोदकर, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष गणेशराव दौड, आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार, रवी किरण चव्हाण, कार्यकारी अभियंता एन. बी. मोरे, उपविभागीय अधिकारी चुन्नीलाल कोकणी, पं. स. सभापती नंदा आगे (सोयगाव), रेखा जगताप (सिल्लोड), उपसभापती रमेश चिंचपुरे, जालना लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अब्दुल समीर, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रा. मन्सूर कादरी, काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष विलास औताडे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा दुर्गाबाई पवार, शहराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड, उपनगराध्यक्ष किरण पवार, जि. प. सदस्य श्रीराम महाजन, कौतिकराव मोरे, कल्पनाबाई लोखंडे, बाबुराव चोपडे, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष केशवराव तायडे, शांतीलाल अग्रवाल, न. प. गटनेता नंदकिशोर सहारे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन रमेश साळवे, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, रऊफ बागवान, शेख बाबर, अशोक साळवे, रईस पठाण, भगवान आरके, राजेंद्र गौर, सुपडू कु रैशी, अकील वसईकर, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, दीपक दौड, योगेश राऊत, दत्तात्रय भवर, मोहंमद हनीफ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सूत्रसंचालन प्रा. राम जंजाळ यांनी केले. आभार डॉ. आराक यांनी मानले. यावेळी पं. स. सदस्य विक्रांत दौड, रोहिदास पवार, दत्तात्रय सोनवणे, रफिक देशमुख, अनिस पठाण, बाजार समितीचे संचालक सुनील काकडे, रघुनाथ गोराडे, माजी उपसभापती सय्यद अजीज बागवान, सुखदेव जिवरग, मधुकर गवळी, सखाराम काळे, हनीफ मुलतानी, राजाराम पाडळे, राजेंद्र मोरे, शांतीलाल बसय्ये, राजू दुधे, संजय आरके, शेख मिया आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Remembrance of Trauma Care Unit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.