शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळ उडाली! हवाई दलाच्या विमानावर हवेत असतानाच मोठा हल्ला; म्यानमारला मदत नेत असताना...
2
Murshidabad Violence : “हल्लेखोर आले, पोलिसांना फोन केला पण...”; मुर्शिदाबाद हिंसाचारातील थरकाप उडवणाऱ्या घटना
3
हृदयद्रावक! गोंडस बाळाला जन्म दिला, चेहरा पाहण्याआधी आईने जगाचा निरोप घेतला
4
चीनच्या एका निर्णयाने अमेरिकाच नाही तर पाश्चिमात्य देशही चिंतेत; ट्रम्प यांच्याकडे कोणता पर्याय?
5
संतापजनक! साड्या वाटपासाठी बोलावलं, रागाच्या भरात आमदाराने महिलेच्या डोक्यावर मारलं अन्...
6
मेघना गुलजारच्या सिनेमात करीना कपूरची वर्णी, 'या' सुपरस्टारसोबत स्क्रीन शेअर करणार
7
जगभर : सोन्याच्या ५०० खाणी असलेला ‘गरीब’ देश; तुम्हाला माहितीये का?
8
विशेष लेख: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला धोक्याचा इशारा विसरू नका
9
तमन्ना भाटिया-विजय वर्माच्या ब्रेकअपचं कारण आलं समोर, या सुपरस्टारने अभिनेत्रीला दिलेला हा सल्ला
10
मुंबईकरांचा प्रवास आणखी सोपा होणार! लवकरच चेंबूर ते मानखुर्ददरम्यान मेट्रो धावणार
11
BSNL युझर्सना खुश करतोय हा प्लान; दीर्घ व्हॅलिडिटीसह मिळताहेत जबरदस्त बेनिफिट्स, काय आहे किंमत?
12
घटना इतकी अचूक आहे की, पुढची हजारो वर्षे बदलावी लागणार नाही - चंद्रकांत पाटील
13
एकीकडे ट्रम्प टॅरिफची दहशत तर, दुसरीकडे आता नोएडातही तयार होणार iPhone; काय आहे कंपनीचा प्लान
14
"..तर तुझी जागा कोणीच घेऊ शकणार नाही!" सुनील शेट्टींनी केलं KL राहुलचं कौतुक, म्हणाले- "त्याचा संघर्ष मी..."
15
"नियतीने थोडी दया दाखवली असती तर...", दोन वर्षांपूर्वी झालेलं लहान भावाचं निधन, अपूर्वाची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट
16
...अन् ते मृत्यूच्या दाढेतून परतले! समुद्रात अडकलेल्या नवी मुंबईतील चार विद्यार्थ्यांची सुटका
17
लय भारी! अपघातात नवऱ्याने गमावला जीव, शिक्षिकेने बनवलं स्मार्ट हेल्मेट; फीचर्स आहेत कमाल
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट; १७ वर्षीय तरुणानं आधी आई वडिलांना संपवलं, मग...
19
बीड जिल्हा रुग्णालयात चाललंय काय? सलग दुसऱ्या दिवशी मातेचा मृत्यू
20
अद्भुत अन् अविश्वसनीय : लेझर किरण पडताच वितळतील शत्रूंची ड्रोन अन् विमानेही, लष्कराचं नवं अस्त्र बघितलं का?

लक्षात असू द्या, बालविवाह रोखण्यासाठी थेट टोल फ्री नंबर १०९८ ला करा कॉल

By प्रशांत तेलवाडकर | Updated: April 4, 2024 18:08 IST

बालविवाह होत असताना हजर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो.

छत्रपती संभाजीनगर : राज्यात बालविवाहांची संख्या मोठी आहे. पण, आता बालविवाह रोखण्यासाठी सरकारी यंत्रणेला गावकरी साथ देत असल्याने हे प्रकार उजेडात येऊ लागले आहेत. तुमच्या गावात, घर परिसरात कुठे बालविवाह होत असले तर थेट टोल फ्री नंबर १०९८ वर कॉल करा, सरकारी यंत्रणा तिथे येऊन तो बालविवाह रोखतील.

किती वर्षाच्या आत लग्न कायद्याने गुन्हा ठरू शकतो१) मुलीचे वय १८ वर्षांच्या आत व मुलाचे वय २१ वर्षांच्या आत असेल तर त्यांचा बालविवाह समजण्यात येतो.२) बालविवाह अधिनियम २००६ नियम २२ अन्वये बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे.३) २ वर्षांपर्यंत सक्त मजुरीची कैद, एक लाख रुपये दंड किंवा दोन्हीही शिक्षा.

कोणावर दाखल होऊ शकतो गुन्हाबालविवाह होत असताना हजर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो. बालविवाह लावणाऱ्या गुरुजींपासून ते आई-वडील वऱ्हाडी, बँड, डिजेवाल्यांपर्यंत सर्वांवर गुन्हे दाखल होऊ शकतात.

चाइल्ड लाइनचा नंबर १०९८ कॉल कराबालविवाह होत असल्यास तुम्ही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर किंवा चाइल्ड लाइनला १०९८ यानंबरवर कॉल करा. जो कॉल करून माहिती देतो त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येते. तसेच या नंबरवर कॉल केला तर त्याचे पैसे लागत नाहीत. तो नंबर विनाशुल्क आहे.

बालविवाह रोखण्याची कोणावर जबाबदारी ?१) ग्रामपंचायत क्षेत्र : ग्रामपंचायत क्षेत्रात बालविवाह होत असले तर त्यास रोखण्याची जबाबदारी सर्व गावकऱ्यांवर आहे. मात्र, शासनाच्या वतीने प्रत्येक ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक हा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आहे. अंगणवाडी सेविकांना सहायक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.२) शहरी भाग : शासनाच्या आदेशानुसार बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून शासनाने घोषित केले आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारी