शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

हे लक्षात असू द्या, अपघाती मृत्यूनंतर असंघटित कामगारांच्या कुटुंबियांना मिळतात दोन लाख !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 17:35 IST

असंघटित कामगारांनी ई- श्रम पोर्टलवर नोंदणीचा लाभ घेऊन सुरक्षा कवच करून घेणे गरजेचे आहे.

- साहेबराव हिवराळे

औरंगाबाद : बांधकाम क्षेत्रासह इतर ठिकाणी काम करणाऱ्या असंघटित कामगारांचा अपघाती अंत झाला तर त्यांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये मिळतात, हे असंघटित कामगारांना माहीतच नाही. असंघटित कामगारांना विमा कवच आल्याने अनेक सुविधा उपलब्ध होत आहेत. शासनाने नुकतेच ई-श्रम पोर्टल सुरू केले असून, त्यात धोबी, बांधकाम व्यावसायिक, शेतमजूर, दूध, चहा, भाजीपाला विक्रेते, फेरीवाले, सायकल दुरुस्ती, गॅरेजवाले यासह ३०० व्यवसायांना ‘पंतप्रधान विमा योजना’ लागू करण्यात आलेली आहे.

केंद्र शासनाने ई-श्रम पोर्टल तयार केले आहे. असंघटित कामगारांनी पोर्टलवर नोंदणीचा लाभ घेऊन सुरक्षा कवच करून घेणे गरजेचे आहे. परंतु, हे बहुतांश असंघटित कामगारांना अद्याप माहीतच नाही.

पोर्टलवर ५२ हजार नोंदणी...५२ हजार कामगारांनी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केली आहे. १२ लाखांचे उद्दिष्ट शासनाने दिलेले आहे. बहुतांश कामगारांची नोंदणी बाकी असून, याविषयी जागृती करण्याची गरज आहे. नोंदणीकृत कामगारच या योजनेसाठी पात्र असतील.

लॉकडाऊननंतर नोंदणीला जोर...कामगार विमा नोंदणी विभागात तीन वर्षांत आठ हजार प्रस्ताव दाखल झाले आहेत. सर्वच ऑनलाईन ठिकाणी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केले जाते. कोविडमुळे तर ही नोंदणी करणे फार गरजेचे आहे. कारण अनेकांना कोविड काळात गंभीर प्रसंगातून जावे लागले.- चंद्रकांत राऊत, कामगार उपायुक्त

योजना आहे, हेच ठाऊक नाही !- शासनाच्या असंघटित कामगारांसाठी योजना आहेत, हे कळलेच नाही. अपघातात पेंटर, बांधकाम मजूर, दूध, भाजीपाला विक्रेत्यालाही विमा मिळतो, हे आता समजले.- संजय जाधव (असंघटित कामगार)

- असंघटित कामगारांना शासनाच्या विविध सेवा-सुविधा मिळत नाहीत. कोविडनंतर लक्षात आले की, आपणही आता नोंदणी करायला हवी. म्हणून नोंदणी करण्यासाठी आलो आहे.- उत्तम काकडे (असंघटित कामगार)

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघातAurangabadऔरंगाबाद