करार रद्द करण्याची नोटीस जारी
By Admin | Updated: April 6, 2016 01:27 IST2016-04-06T00:47:00+5:302016-04-06T01:27:23+5:30
औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचा ठेका घेणाऱ्या बहुचर्चित ‘एसपीएमएल’या कंपनीला करार रद्द करण्यासंदर्भात अखेर महापालिकेने मंगळवारी नोटीस बजावली.

करार रद्द करण्याची नोटीस जारी
औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचा ठेका घेणाऱ्या बहुचर्चित ‘एसपीएमएल’या कंपनीला करार रद्द करण्यासंदर्भात अखेर महापालिकेने मंगळवारी नोटीस बजावली. करारानुसार कंपनीने आजपर्यंत एकही योग्य काम केलेले नाही. भविष्यातही चांगले काम होण्याची अजिबात शक्यता वाटत नाही. त्यामुळे कंपनीने १५ दिवसांमध्ये नोटीसचे उत्तर द्यावे, अन्यथा एकतर्फी करार रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे.