‘युवकांनो स्वावलंबी व्हा, श्रीमंत व्हा’ पुस्तकाचे विमोचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:04 IST2021-09-05T04:04:02+5:302021-09-05T04:04:02+5:30

वैजापूर : ‘युवकांनो स्वावलंबी व्हा, श्रीमंत व्हा’ या पुस्तकाचे विमोचन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते नुकतेच झाले. वोखार्ड कंपनीचे ...

Release of the book 'Youth become self-reliant, become rich' | ‘युवकांनो स्वावलंबी व्हा, श्रीमंत व्हा’ पुस्तकाचे विमोचन

‘युवकांनो स्वावलंबी व्हा, श्रीमंत व्हा’ पुस्तकाचे विमोचन

वैजापूर : ‘युवकांनो स्वावलंबी व्हा, श्रीमंत व्हा’ या पुस्तकाचे विमोचन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते नुकतेच झाले. वोखार्ड कंपनीचे संचालक डॉ. धर्मेंद्र कुमार, उद्योजक रवी डोड्डी, उद्योजक एम. आर. फडतरे व लेखक जे. के जाधव, सरस्वती जाधव यांची उपस्थिती होती.

या पुस्तकात उद्योजकांना व नवउद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी जगातील सुमारे ५० यशस्वी व प्रसिद्ध उद्योजकांची बोधवाक्ये दिली आहेत. उद्योग सुरू करताना कशी काळजी घ्यावी, याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाचा रोजगारनिर्मिती कार्यक्रम, सामूहिक प्रोत्साहन योजना, क्लस्टर डेव्हलपमेंट योजना, एमआयडीसी, खादी व ग्रामोद्योग मंडळ, केंद्र शासनाची पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना, क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट फंड स्कीमचा, महिलांसाठी विविध उद्योगांचा समावेश आहे. हे पुस्तक नवं उद्योजकांसाठी फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी केले.

040921\aher madhukar aher_img-20210903-wa0022_1.jpg

पुस्तकाचे विमोचन

Web Title: Release of the book 'Youth become self-reliant, become rich'