शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

७ वर्षीय मुलीसह आईचा मृतदेह स्वीकारण्यास नातेवाईकांचा नकार; आरोपींच्या अटकेसाठी घाटीत ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 17:39 IST

सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथील माय-लेक मृत्यू प्रकरण

ठळक मुद्देतीन दिवसांपासून बेपत्ता होत्या माय-लेकनातेवाईकांकडून आत्महत्या केली नसल्याचा दावा

सिल्लोड : डोंगरगाव (ता. सिल्लोड) येथे तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या माय-लेकीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. माय-लेकीचे  मृतदेह गावाजवळील एका विहिरीत सापडल्याने खळबळ उडाली होती. त्यांनी आत्महत्या केली नसून बलात्कार करून त्यांची हत्या झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्यानंतर मंगळवारी सकाळी शासकीय रुग्णालय घाटी येथे मृतदेहांचे इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. मात्र,  यानंतर नातेवाईक आणि सामाजिक संघटनांनी आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने रुग्णालयात तणावपूर्ण स्थिती आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, डोंगरगाव येथील विवाहिता ७ वर्षीय मुलीसह तीन दिवसांपासून बेपत्ता होती. कुटुंबातील लोकांनी, नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. त्यामुळे शनिवारी (दि.१५) सिल्लोड ग्रामीण पोलिसांकडे याबाबत नातेवाईकांनी दोघी बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली.  सोमवारी सकाळी ९ ते १० च्या दरम्यान या माय-लेकीचे मृतदेह येथील एका विहिरीत आढळून आले. माहिती मिळताच मोठ्या संख्येने नागरिकांनी विहिरीकडे धाव घेतली. तसेच नातेवाईकही घटनास्थळी जमा झाले. दरम्यान, सोमवारी दुपारी १२ वाजता दोघींचेही प्रेत विहिरीबाहेर काढण्यात आले. प्रेत नेण्यासाठी सरकारी रुग्णवाहिका वेळेवर आली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी उशिरा आलेल्या रुग्णवाहिकेवर दगडफेक करून परतवून लावले. यानंतर खाजगी वाहनाने दोघींचेही पार्थिव सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे मोठ्या संख्येने नागरिकांसह मयतांचे नातेवाईक जमा झाल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर इन कॅमेरा शवविच्छेदनासाठी मृतदेह औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालय घाटी येथे आणण्यात आले. 

घाटी रुग्णालयात मांडला ठिय्या सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथील विहिरीत मृतावस्थेत आढळलेल्या माय-लेकींचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सोमवारी सायंकाळी घाटी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र सायंकाळी ६ वाजेनंतर घाटीत शवविच्छेदन होत नाही. यामुळे आज मंगळवारी सकाळी इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, माय-लेकींच्या मृत्यूविषयी नातेवाईक आणि सामाजिक संघटनांनी संशय व्यक्त करून आरोपींना अटक करण्याची मागणी करत घाटीत ठिय्या मांडला आहे. यानंतरच मृतदेह ताब्यात घेणार असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादagitationआंदोलनgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी