शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

घाटी रुग्णालयात नातेवाइकांना बनावे लागते कर्मचारी; ४० टक्के पदे रिक्त, रोज २ हजार रुग्ण

By संतोष हिरेमठ | Updated: October 16, 2023 16:02 IST

वर्षानुवर्षे ही पदे भरली जात नसल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर रुग्णसेवेचा भार वाढतच आहे.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यासह लगतच्या जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड ठरणाऱ्या घाटी रुग्णालयात तब्बल डाॅक्टर, परिचारिका आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची तब्बल ४० टक्के पदे रिक्त आहेत. तेराशे कर्मचाऱ्यांवर रोज २ हजार रुग्णांचा भार आहे. वर्षानुवर्षे ही पदे भरण्याची नुसती प्रतीक्षाच करावी लागत आहे. परिणामी, नातेवाइकांनाच कर्मचारी बनून रुग्णांची कामे करावी लागतात.

घाटीत १,१७७ खाटा मंजूर आहेत. प्रत्यक्षात दररोज १,८०० ते २ हजार रुग्ण भरती असतात. मंजूर असलेल्या २,२०७ पैकी १,३१० पदे भरलेली आहेत. तब्बल ८९७ पदे रिक्त आहेत. यात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक अशी डाॅक्टरांची ८८ पदे रिक्त आहेत. त्यापाठोपाठ परिचारिका, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचीही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. वर्षानुवर्षे ही पदे भरली जात नसल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर रुग्णसेवेचा भार वाढतच आहे. परिणामी, स्ट्रेचर ढकलण्यापासून अनेक कामे नातेवाइकांना करावी लागत असल्याची परिस्थिती आहे. घाटी रुग्णालयात ५५० निवासी डाॅक्टर कार्यरत आहेत.

जागा तत्काळ भराघाटी रुग्णालयातील रिक्त जागा या तत्काळ भरल्या गेल्या पाहिजेत. सरकारी रुग्णालयाकडे गोरगरीब जनता आशेने पाहत असते.- प्रवीण शिंदे, अभ्यागत समिती सदस्य

नोकर भरती कराघाटीत लवकरात लवकर नोकर भरती झाली पाहिजे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांवर रुग्णसेवेचा भार अधिक आहे.- ॲड. इकबालसिंग गिल, अभ्यागत समिती सदस्य

घाटी रुग्णालयातील मनुष्यबळाची स्थितीसंवर्ग---मंजूर- भरलेली पदे- रिक्त पदे

वर्ग-१ --२८-१६-१२वर्ग-२ --१०४-८४-२०

वर्ग-३ --१८३-१२७-५६

परिचर्या संवर्ग -- ८८९-६५५-२३४परिचर्या विद्यार्थिनी (विद्यावेतन)-२५९-०-२५९

वर्ग-४ --७४४-४२८-३१६एकूण २२०७--१३१०-८९७ 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीdoctorडॉक्टर