वाळू लिलावास ग्रामसभेचा नकार
By Admin | Updated: October 16, 2016 01:15 IST2016-10-16T00:47:20+5:302016-10-16T01:15:10+5:30
टाकळी अंबड : नवगाव येथील ग्रामपंचायतीमध्ये उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत गावकऱ्यांनी

वाळू लिलावास ग्रामसभेचा नकार
टाकळी अंबड : नवगाव येथील ग्रामपंचायतीमध्ये उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत गावकऱ्यांनी गोदावरी नदीतील वाळू लिलाव आणि वाळू उपशाला तीव्र विरोध केला आहे. या संदर्भात ग्रामसभेत वाळू लिलाव व उपसा न करण्याचा ठराव एकमताने संमत करण्यात आला.
विशेष म्हणजे नवगाव येथील वाळू लिलाव न करण्याचा प्रस्ताव या अगोदरच ग्रामपंचयतने प्रशासनास दिला होता. मात्र वाळू लिलाव झाल्यास ग्रामपंचायतीला विकासासाठी निधी मिळतो. त्यामुळे या प्रस्तावाचा पुनर्विचार करण्यासाठी या विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या ग्रामसभेत ग्रामस्थांना वाळू लिलाव आणि वाळू उपशाला तीव्र विरोध केला. यावेळी उपविभागीय अधिकारी नेटके यांच्यासह तहसीलदार डॉ. किशोर देशमुख, भूजल सर्वेक्षण अधिकारी जैन, मंडळ अधिकारी जोशी तलाठी वाघ, सरपंच डॉ. नाहिदा पठाण उपसरपंच अफसर पठाण, माजी पं. स. सदस्य डॉ. गुलदाद पठाण, डॉ. सुरेश चौधरी, शेरू पटेल, दादासाहेब चौधरी कल्याण चौधरी, लक्ष्मण डांगे, अख्तर पठाण, नाशीर पठाण, बबलू शेख, हाशम पठाण यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.