बेसुमार पाणी वापराला बसणार लगाम
By Admin | Updated: August 19, 2014 02:08 IST2014-08-19T01:33:55+5:302014-08-19T02:08:43+5:30
नांदेड: पावसाअभावी निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे शहराला आठवड्यातून एकदा पाणी सोडण्याचा निर्णय महापालिका घेणार आहे़ उपलब्ध असलेले

बेसुमार पाणी वापराला बसणार लगाम
नांदेड: पावसाअभावी निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे शहराला आठवड्यातून एकदा पाणी सोडण्याचा निर्णय महापालिका घेणार आहे़ उपलब्ध असलेले ९ दलघमी पाणी दोन दिवसाआड सोडल्यास दीड महिना पुरणार आहे़ अशा वेळी नागरिक पेयजलाचा वापर बांधकाम, वाहने धुणे, अंगण स्वच्छता करणे व पाळीव प्राणी धुण्यासाठी करत असल्याचे चित्र समोर आले आहे़ या पार्श्वभूमीवर महापालिका पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पथक स्थापन करून पाणी बचतीचे धोरण राबविणार आहे़ नांदेडकरांना यापुर्वी पाणीटंचाईची झळ पावसाळ्यात कधीच बसली नाही़ विष्णूपुरी प्रकल्पातील मुबलक पाण्यामुळे नांदेडकरांच्या घशाला कोरड कधीच पडली नाही़ मात्र यंदा पावसाने पाठ फिरविल्याने प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाला आहे़ त्यामुळे पाण्याविषयी सर्वांनाच आपल्या दैनंदिन सवयीत बदल करावा लागणार आहे़ महापालिकेने यापुर्वीच पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले असले तरी याचे गांर्भीय नागरिकांनी अद्याप घेतले नाही़ मोठ्या प्रमाणात होणारी पाण्याची नासाडी थांबविल्यास संभाव्य पाणी टंचाईवर मात करता येईल़ त्यासाठी आता नागरिकांना पुढाकार घ्यावा लागणार आहे़ सध्या दोन दिवसाआड पाणी सोडण्यात येते़ हे साठविलेले पाणी शिळे झाले म्हणून दुसऱ्या दिवशी फेकून दिले जाते़ हे चुकीचे आहे़ खरे तर व्यवस्थित झाकून ठेवल्यास पाणी खराब होत नाही़ ही जागृती महापालिका, सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालय स्तरावर होणे आवश्यक आहे़ (प्रतिनिधी) नांदेड शहराला सध्या दोन दिवसआड पाणीपुरवठा करण्यात येतो़ मात्र विष्णूपुरी प्रकल्पातील पाणीपातळी घटल्याने महापालिका लवकरच आठवड्यातून एक वेळेस पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेणार आहे़ जिल्हादिवसाआड पाणीपुरवठा लातूर - १० परभणी - ८ उस्मानाबाद - ४ जालना - ८ औरंगाबाद - ३ हिंगोली - ४ बीड - ८ पाणी बचतीचे उपाय बादलीत पाणी घेऊन आंघोळ केल्यास १८ लिटर पाणी लागते़ शॉवरखाली आंघोळ केल्यास कमीत कमी १०० लिटर पाणी वापरले जाते़ नळ सोडून दाढी केली तर १० लिटर; मगमध्ये पाणी घेतल्यास एक लिटऱ नळ उघड ठेवून ब्रश केले तर १० लिटर; मगमध्ये पाणी घेतल्यास १ लिटर, वाहत्या नळाखाली कपडे धुताना ११६ लिटर पाणी लागते, तर बदलीचा वापर केला तर ३६ लिटर लागते़ ४मोटार धुण्यासाठी पाइपचा वापर केला तर १०० लिटर पाणी लागते़ परंतु कपडा बादलीत भिजवून कार धुतली तर १८ लिटर पाण्यात काम होते़ वाहत्या नळाखाली हात धुतले तर १० लिटर, मगमध्ये पाणी घेतले तर अर्धा लिटऱ घरगुती कामासाठी अशा पाणी बचतीचा अवलंब केल्यास प्रत्येक व्यक्तीला ८०़५ लिटर पाणी पुरते़ नेहमीच्या पद्धतीने प्रत्येकाला ३६६ लिटर पाणी लागते़ म्हणजे प्रत्येक व्यक्तीमागे २८५़५ लिटर पाण्याच बचत होऊ शकते़ प्रत्येक कुटुंबात पाच व्यक्ती गृहीत धरल्या तर दर दिवशी १ हजार ४२७ लिटर, तर महिन्यात ४५ हजार ८२५ लिटर पाणी वाचवू शकतो़ हे केल्यास - १) पिण्याच्या पाण्यासाठी छोटे ग्लास केल्यास पाण्यात बरीच बचत होते़ अनेक वेळा मोठ्या ग्लासमधील अर्ध्यापेक्षा जास्त पाणी फेकूनच दिले जाते़ २) टाकी भरल्यानंतर जादा पाणी बाहेर पडण्यासाठी पाइप बसवला तर टाकी भरली हे समजल्याबरोबर नळ लगेच बंद केल्यास पाण्याची नासाडी होणार नाही़ ३) घरातील नळ थेंब थेंब गळत असतो़ त्याकडे आपण दुर्लक्ष करतो़ अशा गळतीमुळे २४ तासांत सुमारे ४- ५ लिटर पाणी वाया जाते़