शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या अपहरणासाठी १५ दिवसांपासून रेकी, जुनी कार, बंदूक खरेदी; मास्टरमाइंड अद्याप फरारच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 13:21 IST

पुण्यात त्यांचा एक अपहरणाचा प्रयत्न फसल्यानंतर गावातीलच एका सधन कुटुंबातील शहरात राहणाऱ्या नातीचे अपहरण करून दीड कोटींची खंडणी मागण्याचे त्याने ठरवले.

छत्रपती संभाजीनगर : खासगी शिकवणी संपवून निघालेल्या ११ वर्षीय मुलीचा चार आरोपींनी कारमधून अपहरणाचा प्रयत्न बुधवारी केला हाेता. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही मोठी दुर्घटना टळली. यात अद्यापही मास्टरमाइंडसह दोन आरोपी पसार असून त्यांच्या शोधासाठी तीन पथके रवाना झाल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

गुरुवारी सायंकाळी ७:३० वाजता खोकडपुऱ्यात आजी- आजोबांसोबत राहणाऱ्या ११ वर्षीय नेहाचे शिकवणीवरून परतल्यानंतर अपहरणाचा प्रयत्न झाला. अपहरणकर्त्यांनी नेहाची रोज ने- आण करणारे कारचालक नवनाथ चेडे यांना बोलण्यात गुंतवूण ठेवत नेहाला कारमध्ये काेंबून सुसाट वेगात पसार झाले. मात्र, चेडे व स्थानिक सतर्क नागरिकांनी कारवर दगड फेकून पाठलाग सुरू केला. शिवाजीनगरमध्ये वाहतूक खोळंबली असल्याने अपहरणकर्त्यांचा कारचा वेग कमी झाला. त्यांनी नेहाला कारबाहेर काढून देत पोबारा केला.

पोलिसांनी कारच्या मुळ मालकाचा शोध घेत आरोपींचा शोध सुरू केला. चोवीस तासांमध्ये पोलिसांनी संदीप ऊर्फ पप्पू साहेबराव पवार (३२, रा. जामखेड, ता. अंबड, जि. जालना) आणि बाबासाहेब अशोक मोरे (४२, रा. विठ्ठलवाडी, ता. अंबड, जि. जालना) यांना अटक केली, तर घटनेचा मास्टरमाइंड गणेश ज्ञानेश्वर मोरे आणि बळीराम ऊर्फ भय्या मोहन महाजन (दोघेही रा. विठ्ठलवाडी, ता. अंबड, जि. जालना) हे अद्यापही फरार आहेत.

अपहरणासाठी कार, बंदुकीची खरेदीगुन्ह्याचा मास्टरमाइंड गणेश गेल्या पंधरा दिवसांपासून अपहरणाचे नियोजन आखत होता. पुण्यात त्यांचा एक अपहरणाचा प्रयत्न फसल्यानंतर गावातीलच एका सधन कुटुंबातील शहरात राहणाऱ्या नातीचे अपहरण करून दीड कोटींची खंडणी मागण्याचे त्याने ठरवले. या अपहरणासाठीच त्याने दीड महिन्यांपूर्वी जुन्या कारसह एका छऱ्याच्या बंदुकीची खरेदी केली होती.

मास्क असल्याने ओळखले नाहीदरम्यान, चालक चेडे, अपहरणकर्ते, नेहाचे कुटुंब एकाच गावातील आहे, तरीही अपहरणादरम्यान चेडेने एकालाही कसे ओळखले नाही, असा प्रश्न पेालिसांना पडला होता. चौकशीदरम्यान, अपहरणकर्त्यांपैकी एक जणच माझ्यासमोर आला. त्या सर्वांनी तोंडाला काळे मास्क लावलेले असल्याने ते ओळखीचे लोक आहे, हे समजून आले नाही, अशी बाजू चेडे यांनी पोलिसांच्या जबाबात मांडली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर