पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रादेशिक भाषेतून
By | Updated: November 28, 2020 04:16 IST2020-11-28T04:16:13+5:302020-11-28T04:16:13+5:30
\Sकेंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय नवी दिल्ली : पुढील शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकीसह तांत्रिक अभ्यासक्रम प्रादेशिक भाषेतून शिकविण्यात येतील. ...

पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रादेशिक भाषेतून
\Sकेंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
नवी दिल्ली : पुढील शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकीसह तांत्रिक अभ्यासक्रम प्रादेशिक भाषेतून शिकविण्यात येतील. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला, असे शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
तांत्रिक शिक्षण, विशेषत: अभियांत्रिकी शिक्षण मातृभाषेतून देण्याच्या हेतूने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यासाठी काही आयआयटी आणि एनआयटी संस्थांची यादी तयार केली जात आहे.
बैठकीत असे ठरले की, राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) शालेय शिक्षण मंडळाच्या परिस्थितीचे आकलन केल्यानंतर स्पर्धात्मक परीक्षेसाठी अभ्यासक्रम ठरविल. एनटीए जेईई-मेन्स आणि नीटसह अन्य परीक्षांचे आयोजन करते.
विद्यापीठ अनुदान आयोगालाही सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती, अधिछात्रवृत्ती वेळेत दिली जाईल, याकडे लक्ष देण्याचे आणि यासाठी यासंदर्भात विद्यार्थ्यांच्या सर्व तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी एक मदत कक्ष (हेल्पलाईन) सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
एनटीएने मागच्या महिन्यात हिंदी आणि इंग्रजीशिवाय २०२१ पासून जेईई-मेन्स परीक्षा नऊ प्रादेशिक भाषात घेण्याचा निर्णय घोषित केला होता.