प्रादेशिक उपायुक्तांनी फेटाळले अपील
By Admin | Updated: May 27, 2015 00:41 IST2015-05-27T00:16:49+5:302015-05-27T00:41:37+5:30
बीड : राजे संभाजी बहूउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या रुख्माई- गोविंद मतिमंद निवासी विद्यालयातील चार शिक्षकांनी नियुक्तीवरुन समाजकल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्तांकडे अपील दाखल केले होते

प्रादेशिक उपायुक्तांनी फेटाळले अपील
बीड : राजे संभाजी बहूउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या रुख्माई- गोविंद मतिमंद निवासी विद्यालयातील चार शिक्षकांनी नियुक्तीवरुन समाजकल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्तांकडे अपील दाखल केले होते. हे अपील प्रादेशिक उपायुक्तांनी नुकतेच फेटाळून लावले आहे.
सारीका बेडके, नितीन आलगुडे, बाळू खोमणे, बिभीषण भोयटे हे चौघे विशेष शिक्षक म्हणून रुख्माई- गोविंद मतिमंद निवासी विद्यालयात कार्यरत २०११- १२ मध्ये एक वर्षासाठी तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत होते. संस्थेच्या नियुक्तीआदेशाआधारे २०१२-१३ या कालावधीत काम करण्यासाठी जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांनी या चारही शिक्षकांना तात्पुरत्या स्वरुपात मान्यता दिली होती. त्यानुसार शिक्षकांनी १७ आॅगस्ट २०१३ पर्यंत काम केले;परंतु संस्थेने केलेली सेवासमाप्तीची कार्यवाही बेकायदेशीर ठरवून रद्द करावी तसेच रूजू करुन सेवासातत्य व थकित वेतन मिळावे यासाठी शिक्षकांनी प्रादेशिक उपायुक्तांकडे अपील दाखल केले होते.त्यानंतर संस्थेने आक्षेप नोंदवला. प्रादेशिक उपायुक्त एस. आर. वळवी यांनी आक्षेप अर्ज मान्य करत शिक्षकांचे अपील फेटाळून लावले.
शिक्षकांवर ठपका
प्रादेशिक उपायुक्त वळवी यांनी शिक्षकांचे अपील फेटाळण्याबरोबरच त्यांना फटकारलेही. विहित मुदतीत अपील दाखल केले नाही. प्रतिवादी म्हणून उल्लेख केलेले मुख्याध्यापक संतोष सरोदे यांना संस्थेने बडतर्फ केले आहे. असे असतानाही प्रतिवादी म्हणून त्यांचा उल्लेख केला. अपिलात दुरुस्ती केली नाही. मुख्याध्यापक सरोदे यांच्याशी संगणमत करुन खोटे पुरावे तयार केले. अपील प्रथमदर्शनी स्वच्छ हाताने दाखल केले नाही. (प्रतिनिधी)