उशीर झाल्याने रामदास आठवले यांना विमानात घेण्यास नकार
By Admin | Updated: May 26, 2015 18:26 IST2015-05-26T18:25:54+5:302015-05-26T18:26:26+5:30
पहाटे जेट एअरवेजच्या विमानाने रामदास आठवले मुंबईहून औरंगाबादला जाणार होते. परंतू, २५ मिनिटे उशिराआल्याचे कारण देत त्यांना विमानात प्रवेश नाकारण्यात आला.

उशीर झाल्याने रामदास आठवले यांना विमानात घेण्यास नकार
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - उशीरझाल्याने आरपीआय नेते रामदास आठवले यांना विमानात प्रवेश करण्यापासून विमान कंपनीने नकारले आहे.
पहाटे जेट एअरवेजच्या विमानाने रामदास आठवले मुंबईहून औरंगाबादला जाणार होते. परंतू, २५ मिनिटे उशिराआल्याचे कारण देत त्यांना विमानात प्रवेश नाकारण्यात आला. पहाटे आठवले यांच्यासहकाऱ्यांनी पहाटे ४:४० मिनिटांनी बोर्डिंगपास घेऊन ते ४:५० मिनिटांनी आठवले यांनी दिले होते. मुंबईहून औरंगाबादला जाणारे विमान पहाटे ५:१५ मिनिटांनी सुटणार होते. ज्याठिकाणी प्रवाशांची तपासणी घेऊन प्रवासाकरता प्रवेश दिला जातो तो गेट अर्धातास आधिच बंद करण्यात येतो. सामानाचे तपास काम करणारा गेट बंद झाल्याने आठवले यांना विमानापर्यंत जाता आले नाही असे कारण जेट एअरवेज या कंपनीने दिले आहे. तसेच अंधेरी येथील जेट एअरवेजच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यास जमलेल्या कार्यकर्त्यांना जेट एअरवेजच्या अधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. तसेच कंपनीने त्यांना पर्यायी सुविधा उपलब्ध करून दिल्याचेही सांगितले. पहाटे उड्डाण होणाऱ्या विमानांना उशीर झाला असता त्याचा परिणाम दिवसभरातील उड्डाणाच्या वेळापत्रकावर होतो. असेही जेट एअरवेज कंपनीच्या पायलटने सांगितले आहे.