शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
6
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
7
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
8
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
9
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
10
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
11
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
12
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
13
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
14
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
15
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
16
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
17
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
18
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
19
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
20
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...

मराठवाड्यातील ७ जिल्ह्यांच्या समावेशाला केंद्राचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 12:13 AM

केंद्र सरकारने देशातील ११५ महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांचे परिवर्तन करण्याच्या योजनेत अतिमागास जिल्ह्यांचा समावेश केला आहे. त्यात मराठवाड्यातील फक्त उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश करण्यात आला होता. मराठवाडा जनता विकास परिषदेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठवून औरंगाबाद वगळता मराठवाड्यातील अन्य सर्व जिल्ह्यांचा या योजनेत समावेश करावा, अशी मागणी केली होती. मात्र, केंद्र सरकारने ती फेटाळली आहे.

ठळक मुद्देमजविपची मागणी केंद्राने फेटाळली : ११५ महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांत विभागाला वाटाण्याच्या अक्षता

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : केंद्र सरकारने देशातील ११५ महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांचे परिवर्तन करण्याच्या योजनेत अतिमागास जिल्ह्यांचा समावेश केला आहे. त्यात मराठवाड्यातील फक्त उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश करण्यात आला होता. मराठवाडा जनता विकास परिषदेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठवून औरंगाबाद वगळता मराठवाड्यातील अन्य सर्व जिल्ह्यांचा या योजनेत समावेश करावा, अशी मागणी केली होती. मात्र, केंद्र सरकारने ती फेटाळली आहे.मराठवाड्यातील सात जिल्हे हे अतिमागास जिल्हे म्हणून पूर्वीच्या केंद्र सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार या सात जिल्ह्यांत मानव विकास मिशनद्वारे विशेष मोहीम राबविली जात होती.हे सात जिल्हे राज्यातील इतर प्रगत जिल्ह्यांच्या मानाने अजूनही मागास आहेत. मागासलेपण दूर करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजना पूर्ण क्षमतेने कालबद्ध पद्धतीने अमलात आणणे. विशेष निधी देणेदेखील आवश्यक आहे. असे असताना केंद्र सरकारने अपुऱ्या माहितीच्या आधारे हा नकार दिलेला दिसतो, असा आरोप मजविपचे अध्यक्ष अ‍ॅड. देशमुख यांनी केला आहे. यासंबंधी जनता विकास परिषद पुन्हा पाठपुरावा करणार असल्याचेही सांगितले.महाराष्ट्र सरकारचकमी पडले११५ जिल्ह्यांत भाजप सत्तेवर असलेल्या उत्तर भारतातील राज्यातील जिल्ह्यांचाच भरणा अधिक आहे हे स्पष्टपणे दिसून येते. झारखंड १९, बिहार १३, छत्तीसगढ १०, आसाम ७, मध्यप्रदेश ८, ओडिसा ८, उत्तर प्रदेश ८ या सर्वाधिक जिल्हे निवड झालेल्या राज्यांचा समावेश आहे.झारखंड, छत्तीसगढ, आसाम आणि ओडिसा या छोट्या राज्यांतील सर्वाधिक जिल्हे निवडले आहेत. ते निकषात बसतात असे गृहीत धरले तरीदेखील ही आकडेवार पाहता महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातील मागास जिल्ह्यांच्या बाबतीत वस्तुनिष्ठ अहवाल देण्यात अथवा पाठपुरावा करण्यात कमी पडले हेच यातून स्पष्ट होते, असा आरोप अ‍ॅड. देशमुख यांनी केला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्तिश: याची चौकशी करून मराठवाड्यासह राज्यातील जास्तीत जास्त मागास जिल्ह्यांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.नीती आयोगाचे मजविपला पत्रनीती आयोगाचे ज्येष्ठ सल्लागार राकेश रंजन यांनी पत्र पाठवून केंद्र सरकारचा निर्णय मजविपला कळविला आहे. आयोगाने पत्रात म्हटले आहे, महत्त्वाकांक्षी जिल्ह्याची निवड करताना वेगवेगळ्या खात्यांकडून मिळालेली माहिती आरोग्य, शिक्षण, कृषी इत्यादींशी संबंधित निकष आणि राज्य सरकारची शिफारस लक्षात घेऊन जिल्ह्यांची निवड केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील वाशिम, गडचिरोली, उस्मानाबाद आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा योजनेत समावेश केला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील सात जिल्ह्यांचा समावेश करण्याची विनंती स्वीकारली जाऊ शकत नाही. सदरील योजनेनुसार जास्त निधी उपलब्ध करून देण्यात येणार नाही, तर अस्तित्वात असलेल्या राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनाच राबविण्यात येणार आहेत, असेही आयोगाने पत्रात स्पष्ट केले आहे.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी