‘एनए’साठी भरलेली रक्कम सव्याज परत करा
By Admin | Updated: July 21, 2014 00:43 IST2014-07-21T00:40:56+5:302014-07-21T00:43:35+5:30
औरंगाबाद : सातारा परिसरातील मालमत्ताधारकांनी ‘एनए- ४७ बी’ करण्यासाठी भरलेली रक्कम सव्याज परत करण्याची मागणी निवेदनाद्वारे ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालयाकडे केली आहे.

‘एनए’साठी भरलेली रक्कम सव्याज परत करा
औरंगाबाद : सातारा परिसरातील मालमत्ताधारकांनी ‘एनए- ४७ बी’ करण्यासाठी भरलेली रक्कम सव्याज परत करण्याची मागणी सातारा परिसर विकास महिला कृती समितीने निवेदनाद्वारे ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालयाकडे केली आहे.
सातारा परिसरातील एनए-४५ मध्ये केलेली सर्व बांधकामे १५ डिसेंबर २०११ ते १५ मार्च २०१२ या काळात दंड आकारून नियमित केली जाणार आहेत, असे जाहीर करण्यात आले होते. यास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. नागरिकांनी एनएन-४५ असणारी मालमत्ता एनए-४७ ब करण्यासाठी ३५ रुपयांचा अर्ज विकत घेऊन सर्व कागदपत्रांसह १४४५ रुपयांचा डिमांड ड्राफ्ट भरला. तीन वर्षे झाली तरीही मालमत्ता नियमित झालेल्या नाहीत.
आगामी काळात सातारा-देवळाई नगर परिषद अस्तित्वात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी भरलेल्या पैशांचा काहीच उपयोग झालेला नाही. त्यामुळे भरलेली रक्कम व्याजासह परत करावी, अशी मागणी त्यात करण्यात आली आहे.
निवेदनावर सातारा परिसर विकास महिला कृती समितीच्या अध्यक्षा मेघा थोरात, बी. बी. थोरात, टी. एम. मकर, एस. पी. कुलकर्णी, एस. एम. वारके, कांताराम भोसले, सिंधू बनसोडे, मालती शिंदे, बी. व्ही. काकडे, बबन सानप, छाया जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.