व्याजाची घेतलेली रक्कम बँकेकडून पुन्हा परत
By | Updated: November 28, 2020 04:11 IST2020-11-28T04:11:19+5:302020-11-28T04:11:19+5:30
सय्यदलाल बाजारसावंगी : महात्मा ज्याेतीराव फुले कर्जमुक्ती योजनेत जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेने घेतलेल्या व्याजाची रक्कम ...

व्याजाची घेतलेली रक्कम बँकेकडून पुन्हा परत
सय्यदलाल
बाजारसावंगी : महात्मा ज्याेतीराव फुले कर्जमुक्ती योजनेत जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेने घेतलेल्या व्याजाची रक्कम शेतकऱ्यांना परत देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेचे संचालक किरण पाटील डोणगावकर यांनी दिली.
महात्मा ज्योतीराव फुले योजनेतील कर्जमुक्ती योजनेत जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेने शेतकऱ्यांकडून व्याजाची आकारणी करुन वसुली केली होती. याविषयी बहुसंख्य शेतकऱ्यांनी शासनाकडे विरोध नोंदवला होता. त्यानंतर शेतकऱ्यांकडून रकमेवरील व्याज शेतकऱ्यांना परत करण्याचे शासनाने आदेश दिले होते. त्यानंतर शेतकऱ्यांचे व्याज शेतकऱ्यांना परत रोखीने न देता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती के. बी. काळे यांनी दिली.
लाभार्थी शेतकरी
बाजारसावंगी येथील ३५५ शेतकऱ्यांचे ६ लाख १४ हजार तर ताजनापूर येथील ७६ शेतकऱ्यांचे १ लाख ४८ हजार रुपये जमा झाली आहेत. पाडळी येथील २६४ शेतकऱ्यांचे ४ लाख ३२ हजार, कनकशीळ येथील ५१ शेतकऱ्यांचे ८६ हजार ७१५ रुपये, सोबलगाव येथील ५२ शेतकऱ्यांचे ९१ हजार, जानेफळ येथील १३ शेतकऱ्यांचे १२ हजार ४७०, शिरोडी (बु) येथील ११७ शेतकऱ्यांचे १ लाख ४५ हजार रुपये खात्यात जमा झाले आहेत. डोंगरगाव येथील १५ शेतकऱ्यांचे १९ हजार, बोडखा येथील २१० शेतकऱ्यांचे ३ लाख ८३ हजार, लोणी येथील १९८ शेतकऱ्यांचे ३ लाख ३७ हजार व धामणगाव येथील २ शेतकऱ्यांचे व्याज त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहे.