उर्दू साहित्यामध्ये राष्ट्रीय एकतेचे प्रतिबिंब, चर्चासत्र उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:16 IST2021-02-05T04:16:15+5:302021-02-05T04:16:15+5:30
मौलाना आझाद महाविद्यालय, क्रेसेंट सोसायटी औरंगाबादच्या वतीने सोमवारी ‘उर्दू साहित्यामध्ये राष्ट्रीय एकतेचे प्रतिबिंब’ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र घेण्यात ...

उर्दू साहित्यामध्ये राष्ट्रीय एकतेचे प्रतिबिंब, चर्चासत्र उत्साहात
मौलाना आझाद महाविद्यालय, क्रेसेंट सोसायटी औरंगाबादच्या वतीने सोमवारी ‘उर्दू साहित्यामध्ये राष्ट्रीय एकतेचे प्रतिबिंब’ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र घेण्यात आले. अध्यक्षीय भाषणात खान पुढे म्हणाले की, ८०० वर्षांच्या इतिहासाचा आढावा घेतला तर उर्दू भाषेची निर्मिती भारतात झाली आणि या भाषेचा मूळ गाभा अनेक भाषा आहेत. हिंदी, संस्कृत, मराठी, अरबी, इंग्रजी, तेलगू, कन्नड, फारसी शब्दांपासून उर्दूचा जन्म झाला.
ऑल इंडिया रेडिओचे माजी प्रसारक खान मुखीम खान यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी उर्दू ही प्रेमाची भाषा असून, अनेक शतकांपासून मुस्लिम साहित्यिकांनी हिंदू संस्कृतीबद्दल आपल्या काव्यरचना व साहित्यातून विचार मांडले. उर्दू हे केवळ प्रेमाची भाषा नव्हे तर मानवाला मानवाशी जोडणारी भाषा आहे. प्रमुख वक्ते डॉ. मिर्झा मो. खिझर बेग यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासामागील राष्ट्रीय भावनेच्या तत्त्वांमुळे कशाप्रकारे आपणास स्वतंत्र मिळाले तसेच उर्दू भाषा प्रत्येक भारतीयाला आपल्या देशाविषयी असलेला अभिमान जागृत करण्यास सार्थक ठरते, असे सांगितले. डॉ. मिर्झा अख्तर बेग यांनी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या पत्रातून पत्रकारितेच्या संदर्भाने उर्दू भाषेद्वारे राष्ट्रीय एकात्मता कशी वाढवता येईल, याबाबत माहिती दिली. डॉ. काझी नाविद यांनी वली दखनी, सिराज औरंगाबादी तसेच उर्दू लेखक व कवी यांच्या साहित्यावर प्रकाश टाकला. प्राचार्य डॉ. मझहर अहमद फारुकी यांनीही मार्गदर्शन केले. डॉ. रेहाना बेगम यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सोहेल झकीउद्दीन यांनी आभार मानले.