शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठवाड्यात  टँकरचा आकडा कमी; पण टंचाईच्या झळा वाढल्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 19:22 IST

मराठवाड्यात यंदा मागील पाच वर्षांच्या तुलनेत टँकरचा आकडा कमी असला तरी टंचाईच्या झळा मात्र वाढू लागल्या आहेत.

ठळक मुद्देपावसाळा सुरू होण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. तीन जिल्ह्यांत पाणीटंचाईची परिस्थिती नाजूक वळणावर आहे. 

औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा मागील पाच वर्षांच्या तुलनेत टँकरचा आकडा कमी असला तरी टंचाईच्या झळा मात्र वाढू लागल्या आहेत. पावसाळा सुरू होण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. तोपर्यंत ग्रामीण भागाला टँकरने पिण्याचा पाणीपुरवठा करावा लागणार आहे. तीन जिल्ह्यांत पाणीटंचाईची परिस्थिती नाजूक वळणावर आहे. 

विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी बुधवारी मराठवाड्यातील जलयुक्त शिवार योजना, टँकरने पाणीपुरवठा, शेततळे, प्रकल्पांतील पाणीसाठा, विहिरींचे अधिग्रहण याबाबत माहिती दिली. आयुक्त डॉ. भापकर म्हणाले, मराठवाड्यात लहान-मोठे व मध्यम ८६७ प्रकल्प आहेत. २३ टक्के पाणीसाठा आहे. ११ मोठी धरणे आहेत. जायकवाडीत ४५ टक्के पाणीसाठा आहे. उर्वरित प्रकल्पांमध्ये २६ टक्के पाणी आहे. ४७२ टँकर विभागात सुरू आहेत. त्यात औरंगाबादेत सर्वाधिक टँकर सुरू आहेत. परभणी, नांदेडमध्येही टँकर सुरू आहेत. विहिरींचे अधिग्रहण करावे लागले आहे. जास्तीत जास्त विहिरी औरंगाबाद व नांदेड जिल्ह्यात आहेत. पाच वर्षांतील स्थिती पाहिली तर यावर्षी सर्वाधिक कमी टँकर आहेत.

११ प्रकल्पांवर मोठी शहरेअवलंबून आहेत. एमआयडीसी व प्रादेशिक योजनांना यातून पाणीपुरवठा होतो आहे. यावर्षी आराखडा तीन टप्प्यांत केला होता. दर तीन महिन्यांसाठी आराखडा होता. एप्रिल ते जून या कालावधीसाठी केलेल्या आराखड्यासाठी काही योजनांचा अंतर्भाव केला आहे. गेल्या वर्षी ८६ टक्के पाऊस विभागात झाला. औरंगाबाद, नांदेड, जालना जिल्ह्यात पाऊस कमी झाला. चार ते पाच वर्षांच्या तुलनेत यंदा टँकरची संख्या कमी आहे. जलयुक्त शिवार योजनेचाही फायदा झाला आहे. जायकवाडी भरल्यामुळे टंचाई कमी झाली आहे. जलयुक्त शिवारमध्ये मोठ्या प्रमाणात काम होत आहे. ५० हजार विहिरींचे काम गेल्या दोन वर्षांत झाले आहे. ३१ हजार विहिरींचे काम प्रगतिपथावर आहे. २६ हजार शेततळी विभागात दिली आहेत, असे आयुक्तांनी पत्रकारांना सांगितले.  वर्ष    टँकरचा आकडा २०१३-१४     २१३६ २०१४-१५     १४४४२०१५-१६     ४०१५२०१६-१७    ०९४०२०१७-१८    ०४७२ एकूण    ९०३७ 

टॅग्स :MarathwadaमराठवाडाWaterपाणीdroughtदुष्काळwater shortageपाणीकपात