दिवसाकाठी साडेपाच हजार लिटर्स दुधाची घट

By Admin | Updated: May 12, 2016 00:51 IST2016-05-12T00:18:55+5:302016-05-12T00:51:17+5:30

लातूर : लातूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून अवर्षणग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

Reduced milk consumption of 2.5 thousand liters a day | दिवसाकाठी साडेपाच हजार लिटर्स दुधाची घट

दिवसाकाठी साडेपाच हजार लिटर्स दुधाची घट

लातूर : लातूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून अवर्षणग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जिल्ह्यातील साडेपाच लाख पशुधनासाठी लागणारा चाराच संपल्याने दूध उत्पादनामध्येही दिवसाकाठी साडेपाच हजार लिटर्स दुधाची घट झाली आहे. लातूर जिल्ह्यात सहकारी दूध संकलन केंद्रामध्ये जिल्हा दूध संघ उदगीर व मांजरा दूध संकलन तालुका संघ लातूर या दोन केंद्रांच्या माध्यमातून दूध संकलन केले जाते. तर खाजगीमध्ये कपिला दूध डेअरी, गोपाळ महाराज दूध डेअरी, वारणा दूध डेअरी, लामजना, शिरूर ताजबंद, रिलायन्स दूध डेअरी उदगीर, साई दूध डेअरी अशा पाच ठिकाणी म्हणजे एकूण सात ठिकाणी दूध संकलन केले जाते. मार्चमध्ये सहकारी दूध संकलन केंद्राच्या माध्यमातून १३ हजार ७६२ लिटर्स दूध संकलन होत होते. तर खाजगी दूध संकलन केंद्राच्या माध्यमातून १८ हजार ९६९ लिटर्स दूध संकलन केले जात होते. म्हणजे एकूण ३२ हजार ७३१ लिटर्स दूध संकलन होत होते. त्या दूध संकलनाच्या प्रमाणात एप्रिलमध्ये सहकारी दूध संकलन केंद्राच्या माध्यमातून १० हजार ९३७ तर खाजगी दूध संकलन केंद्राच्या माध्यमातून १६ हजार ८७ अशा एकूण २७ हजार ३४ लिटर्सचे दूध संकलन केले जात आहे. गेल्या मार्च महिन्याच्या प्रमाणात एप्रिलमध्ये ७ लाख ५० हजार पशुधनासाठी लागणारा चाराच संपल्याने त्याचा अप्रत्यक्ष दूध उत्पादनावर परिणाम झाला आहे. मार्चमध्ये ३२ हजार ७३१ लिटर्सचे दिवसाकाठी दूध संकलन केले जात होते. त्यामध्ये कमालीची घट होऊन हे दूध संकलन २७ हजार ३४ लिटर्सवर आले आहे. त्यामुळे गेल्या महिन्याच्या प्रमाणात सरासरी दिवसाकाठी ५ हजार ७०० लिटर्स दुधाची घट झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Reduced milk consumption of 2.5 thousand liters a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.