शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कचरा उचलणाऱ्या रेड्डी कंपनीने आतापर्यंत घेतले ७ बळी; निष्काळजीपणे वाहतूक कधी थांबणार?

By मुजीब देवणीकर | Updated: October 4, 2023 18:58 IST

वर्दळीच्या रस्त्यांवरून हा कचरा लवकरात लवकर प्रक्रिया केंद्रावर नेण्याची घाई कंपनीच्या कर्मचाऱ्यांना असते.

छत्रपती संभाजीनगर : शहरातील संपूर्ण कचरा उचलण्यासाठी महापालिकेने रेड्डी कंपनीला २०१९ मध्ये कंत्राट दिले. मागील चार-पाच वर्षांत कंपनीने तब्बल ७ निष्पाप नागरिकांचा जीव घेतल्याची माहिती आहे. यातील बहुतांश बळी निष्काळजीपणे वाहन चालविल्याचे आहेत. वारंवार अपघात होत असतानाही कंपनीकडून कोणतीही खबरदारी घेण्यात येत नाही, हे विशेष.

रेड्डी कंपनीच्या ३०० रिक्षा कचरा संकलनासाठी ११५ वॉर्डांत नियुक्त केल्या आहेत. घंटागाडीत जमा होणारा कचरा एका मोठ्या कॉम्पॅक्टरमध्ये टाकण्यात येतो. हा कचरा कॉम्पॅक्टरद्वारे चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव येथील प्रक्रिया केंद्रावर नेण्यात येतो. घंटागाड्यांचा कचरा एकत्रित करण्यासाठी शहरात एकूण ९ ठिकाणे निश्चित केली आहेत. २० पेक्षा अधिक कॉम्पॅक्टरद्वारे दररोज ४०० ते ४५० मे. टन कचऱ्याची वाहतूक होते. सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत सर्वांत जास्त कचऱ्याची वाहतूक होते. सायंकाळी ७ नंतर अत्यंत कमी वाहने वापरली जातात.

सकाळी शहरातील सर्वच रस्त्यांवर वाहनांची वर्दळ असते. वर्दळीच्या रस्त्यांवरून हा कचरा लवकरात लवकर प्रक्रिया केंद्रावर नेण्याची घाई कंपनीच्या कर्मचाऱ्यांना असते. अन्य वाहनधारकांची कोणतीही पर्वा न करता ही वाहने अत्यंत निष्काळजीपणे चालविण्यात येतात. त्यातून अनेकदा अपघात झाले आहेत. पण, यातून कंपनीने कोणताही बोध घेतला नसल्याचे दिसून येते.

कंत्राटी चालक, पगाराचे वांधेरेड्डी कंपनीने अत्यंत कमी पगारावरील चालकांची नियुक्ती केली आहे. या चालकांना मोठी वाहने चालविण्याचा अनुभव आहे किंवा नाही, हे सुद्धा तपासलेले नाही. पगार कमी असल्याच्या मुद्यावरून कंपनीच्या चालकांनी अनेकदा मनपासमोर आंदोलने केली.

वारंवार सूचना दिल्या जातातखासगी कंपनीच्या वाहनांच्या फिटनेसची आणि कागदपत्रांची तपासणी केली जाते. चालकांनी वाहने सावकाश हळुवारपणे चालवावीत, अशा सूचना मनपाकडून नेहमी देण्यात येतात. मंगळवारी दुपारी झालेला अपघात दुर्दैवी असून, कंपनीला पुन्हा एकदा काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.- सोमनाथ जाधव, उपायुक्त, घनकचरा विभाग.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न