आजपासून भरती

By Admin | Updated: June 6, 2014 01:03 IST2014-06-06T00:21:07+5:302014-06-06T01:03:05+5:30

परभणी : जिल्हा पोलिस दलातील १४४ पदांसाठी ६ जूनपासून पोलिस भरतीला प्रारंभ होत आहे.

Recruitment from today | आजपासून भरती

आजपासून भरती

परभणी : जिल्हा पोलिस दलातील १४४ पदांसाठी ६ जूनपासून पोलिस भरतीला प्रारंभ होत आहे. सुरूवातीला कागदपत्र तपासणी आणि त्यानंतर शारीरिक चाचणी होणार आहे. या भरतीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या पोलिस दलात कर्मचार्‍यांची भर पडणार आहे.
जिल्हा पोलिस दलात पोलिस कर्मचार्‍यांनी अनेक पदे रिक्त आहेत. त्यातच नव्याने दोन पोलिस ठाण्यांची निर्मिती झाली आहे. या १४४ पदांमुळे जिल्ह्यातील पोलिस कर्मचार्‍यांच्या संख्येत वाढ होणार आहे.
६ जून रोजी या भरती प्रक्रियेला पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर प्रारंभ होईल. सुरुवातीला कागदपत्रे तपासणी होईल. ही तपासणी १२ जूनपर्यंत चालणार असून, त्यानंतर १५ जूनपासून शारीरिक चाचणी घेतली जाईल. पोलिस प्रशासनाच्या संकेतस्थळावरुन उमेदवारांना प्रवेश पत्र मिळणार असून, या प्रवेशपत्रावर दिलेल्या तारीख आणि वेळेनुसार त्यांनी कागदपत्र तपासणीसाठी उपस्थित रहावे. पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर कागदपत्र तपासणी आणि शारीरिक चाचणी होईल, असे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

असे लागणार प्रमाणपत्र
सर्व उमेदवारांनी २५ मे पूर्वीचे शैक्षणिक कागदपत्र आणणे आवश्यक आहे. उमेदवारांनी शाळेचा दाखला, सनद, मागासवर्गीय असल्यास जातीचे मूळ कागदपत्र, २०१३-१४ चे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास सैनिक सेवेचे डिस्चार्ज कार्ड, खेळाडू असल्यास खेळाचे प्रमाणपत्र सोबत आणावेत, असे आवाहन पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भरतीविषयी माहिती दिली. ते म्हणाले, ही भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक घेतली जाणार आहे. उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये. भरतीविषयी उमेदवारांना काही शंका असल्यास त्यांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक नियती ठाकर (मो. ७७९८८८५१७६), लिपीक ९५५२५५४६८१, ९९२३३००५५० या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सहा हजार अर्ज
१४४ पदांच्या या भरती प्रक्रियेसाठी ६ हजार ४०२ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. उमेदावारांना आॅनलाईन प्रवेशपत्र मिळणार प्राप्त होणार आहे.

Web Title: Recruitment from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.