आजपासून पोलीस भरती; दोन सत्रांत मैदानी चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2016 00:44 IST2016-03-29T00:28:44+5:302016-03-29T00:44:30+5:30
लातूर : जिल्हा पोलिस दलातील ३१ जागांसाठी आजपासून बाभळगाव मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रिया होत असून, ही प्रक्रिया सकाळ आणि सायंकाळ अशा दोन टप्प्यात होणार आहे.

आजपासून पोलीस भरती; दोन सत्रांत मैदानी चाचणी
लातूर : जिल्हा पोलिस दलातील ३१ जागांसाठी आजपासून बाभळगाव मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रिया होत असून, ही प्रक्रिया सकाळ आणि सायंकाळ अशा दोन टप्प्यात होणार आहे. दरम्यान, मंगळवारपासून मैदानी चाचणी होणार असून, बाभळगाव येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर चाचणी होणार असल्याने परिसरातील मार्गात बदल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलिस दालाच्यावतीने मंगळवारपासून पोलिस भरती होत असून, एकूण ३१ जागांसाठी ३ हजार १४१ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहे. राज्यभरात एकाच दिवशी होणाऱ्या या भरती प्रक्रियेमुळे एका उमेदवाराला एकाच ठिकाणी सहभागी होता येणार आहे. आॅनलाईन प्रक्रियेमुळे कारभार पारदर्शक होईल, असा आशावाद सूत्रांनी व्यक्त केला आहे. ४ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत हे अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी तब्बल ३ हजार १४१ उमेदवादांचे अर्ज वैध ठरले असून, बाभळगाव येथील पोलिस मुख्यालयावर सात दिवस भरती प्रक्रिया चालणार आहे. (प्रतिनिधी)