...जीवघेणी ‘भरती’ !
By Admin | Updated: November 4, 2014 01:38 IST2014-11-04T00:35:19+5:302014-11-04T01:38:36+5:30
बीड : पोलीस भरती असो की सैन्य भरती, प्रत्येक भरती प्रक्रिया आता जीवघेणी ठरत आहे. भरती दरम्यान योग्य सोयी-सुविधा मिळत नसल्यानेच उमेदवारांवर जीव गमवण्याची वेळ येत आहे.

...जीवघेणी ‘भरती’ !
बीड : पोलीस भरती असो की सैन्य भरती, प्रत्येक भरती प्रक्रिया आता जीवघेणी ठरत आहे. भरती दरम्यान योग्य सोयी-सुविधा मिळत नसल्यानेच उमेदवारांवर जीव गमवण्याची वेळ येत आहे. याचे ज्वलंत उदाहरण बीडच्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सोमवारी सैन्य भरतीदरम्यान दिसून आले. यापूर्वीही झालेल्या पोलीस भरती दरम्यान महिला उमेदवाराला चक्कर आली होती.
सय्यद जमीर सय्यद बालम (वय २०, रा़ चापडगाव, ता़ कर्जत, जि़ अहमदनगर) या उमेदवाराचा सोमवारी सकाळी वैद्यकीय चाचणी दरम्यान मृत्यू झाला. चार महिन्यापूर्वी याच मैदानावर पोलीस भरती प्रक्रिया पार पडली. यावेळी जिल्ह्यातील व परजिल्ह्यातील भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना पुरेशा सोयी-सुविधा मिळाल्या नव्हत्या. त्यावेळीही एका महिला उमेदवाराला धावताना चक्कर आली होती. त्या महिलेला तात्काळ रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यामुळे तिच्या प्रकृतीत लवकर सुधारणा झाली. सोमवारीही रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी सतर्क राहिले असते तर ‘मिल्ट्रीमॅन’चे स्वप्न उराशी बाळगून भरती प्रक्रियेत उतरलेल्या जमीरचा मृत्यू झाला नसता, अशी चर्चा ऐकावयास मिळाली.
चार महिन्यापूर्वी पार पडलेल्या भरतीत अनेक सुविधांचा अभाव होता. सुविधा नसल्यामुळेच उमेदवारांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे उमेवारांमधून नाराजीचा सूर निघत होता. (प्रतिनिधी)
पोलीस भरतीदरम्यान बीडमध्ये अनेक महिला, पुरूष उमेदवारांना चक्कर येणे, बेशुद्ध पडणे यासारखे प्रकार घडले होते.
४भर उन्हातही भरती प्रक्रिया घेतली जात असतानाही उमेदवार नोकरीच्या आशेने चाचणी देत होते. कोणीही तक्रार देण्यास पुढे येत नव्हते.
४त्यावेळेस सहन केले आणि आताही सहन केलेल्या उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया आता जीवघेणी ठरू लागली आहे़
४यापूर्वी पोलीस भरतीदरम्यान घडलेल्या घटना पाहता सुद्धा प्रशासनाच्या वतीने कसलीच काळजी घेण्यात आली नसल्यानेच सोमवारी जमीरचा मृत्यू झाला, असा आरोप जमीरच्या नातेवाईकांनी केला आहे़