शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये महावितरणची वसुली जोरात; २३ दिवसांत ३६ कोटी जमा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 13:50 IST

महावितरणने १ मार्चपासून शहर व परिमंडळांतर्गत वीज बिलाच्या थकबाकी वसुलीसाठी प्रभावी मोहीम राबविली.

औरंगाबाद : महावितरणने १ मार्चपासून शहर व परिमंडळांतर्गत वीज बिलाच्या थकबाकी वसुलीसाठी प्रभावी मोहीम राबविली. अवघ्या २३ दिवसांत अधिकारी-कर्मचारी आणि अभियंत्यांनी शहरातील ग्राहकांकडून ३६ कोटी ३० लाख रुपयांची थकबाकी वसूल केली, हे विशेष!

३१ मार्चपर्यंत ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असली, तरी ही धडक मोहीम वर्षभर चालूच ठेवण्याचे निर्देश मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी शनिवारी शहर मंडळ तसेच ग्रामीण मंडळांतर्गत सर्व अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व उपविभागीय अधिकारी अभियंत्यांची व वित्त व लेखा विभागातील अधिकार्‍यांना बैठकीत दिले.

एक मार्चपासून औरंगाबाद शहरात वीज ग्राहकांकडून ३६ कोटी ३० लाख रुपये एवढी थकबाकी वसूल करण्यात आली. येत्या ७ दिवसांत १६ कोटी १५ लाख रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट आहे. यामध्ये औरंगाबाद शहर मंडळांतर्गत पॉवर हाऊस उपविभागाने ४ कोटी रुपयांची थकबाकी वसूल केली. या उपविभागाला आता १ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. शहागंज उपविभागाने ६ कोटी वसूल केले. आता ४ कोटी थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले. छावणी उपविभागाने ८ कोटी रुपयांची थकबाकी वसुली केली असून, आता उर्वरित ४ कोटी थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले. वाळूज उपविभागाला ६५ लाख थकबाकी वसूल करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. चिकलठाणा उपविभागात ६ कोटी ५० लाखांची थकबाकी वसुली झाली असून, या उपविभागासमोर आता २ कोटींच्या थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट आहे. सिडको उपविभागाने ३ कोटी थकबाकी वसुली केली असून, १ कोटी थकबाकी वसूल करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले.

क्रांतीचौक उपविभागात ४ कोटी ३० लाख थकबाकी वसुली केली असून, या उपविभागाला १ कोटी ५० लाख थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले. गारखेडा उपविभागाने ४ कोटी ५० लाख थकबाकी वसुली केली असून, २ कोटी थकबाकी वसूल करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले.या बैठकीत अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल, रतन सोनुले, प्रणाली विश्लेषक दिलीप मालखेडे, प्रकाश चांडगे, कार्यकारी अभियंता रेखा कुलकर्णी, पवनकुमार कछोट, अभिजित सिकणीस, सिद्धार्थ जाधव, योगेश निकम, नामदेव गांधले, राम काळे, प्रेमसिंग राजपूत, उपविभागीय अधिकारी, अभियंते, व्यवस्थापक (वित्त व लेखा) व अन्य अधिकारी-अभियंते उपस्थित होते.

कामचुकारांविरुद्ध कारवाईचा इशाराऔरंगाबाद ग्रामीण मंडळांसमोर १५ कोटी थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट आहे. यामध्ये पैठण उपविभागाला २ कोटी, औरंगाबाद ग्रामीण उपविभाग एकसाठी १ कोटी ७० लाख, औरंगाबाद ग्रामीण उपविभाग दोनसाठी २ कोटी, गंगापूर उपविभागाला २ कोटी ५० लाख, खुलताबाद उपविभागाला ७० लाख, फुलंब्री उपविभागाला ८० लाख.

कन्नड उपविभागाला १ कोटी ५० लाख, सिल्लोड उपविभागाला २ कोटी, पिशोर उपविभागाला ५० लाख, वैजापूर उपविभागाला १ कोटी २० लाख, सोयगाव उपविभागाला ५० लाख रुपयांच्या थकबाकीचे उद्दिष्ट देण्यात आले. ३१ मार्चपर्यंत वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण न करणार्‍या अभियंत्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.

टॅग्स :mahavitaranमहावितरणMONEYपैसाAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी