कर्ज वसुलीला स्थगिती असताना वसुली
By Admin | Updated: March 19, 2015 00:17 IST2015-03-19T00:08:56+5:302015-03-19T00:17:38+5:30
लातूर : गेल्यावर्षी झालेली गारपीठ व आवकाळी पावसामुळे तसेच ५० पेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावामध्ये शेतीशी निगडीत सर्वच वसुलींना स्थगिती देण्यात आली आहे़

कर्ज वसुलीला स्थगिती असताना वसुली
लातूर : गेल्यावर्षी झालेली गारपीठ व आवकाळी पावसामुळे तसेच ५० पेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावामध्ये शेतीशी निगडीत सर्वच वसुलींना स्थगिती देण्यात आली आहे़ शासनाचे तसे तीन परिपत्रक आहेत़ मात्र या परिपत्रकांकडे कानाडोळा करीत वसुली सुरुच आहे़
शेतीशी निगडीत ८० ते ९० टक्के शेतकऱ्यांकडून बँकांनी कर्ज वसूल केले आहे़ शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा असल्यास अन्य योजनांचा लाभ मिळणार नसल्याचे कारण पुढे करुन ही वसुली केली जात असल्याचे अॅड. दत्ता पाटील यांनी सांगितले़ केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने पंजाबराव देशमुख पीक कर्ज योजना राष्ट्रीयकृत बँकामार्फत राबविण्यात येते़ या योजनेत १ लाखाच्या आतील कर्ज बिनव्याजी असते़ तर ३ लाखाच्या पुढील कर्जावर ४ टक्के व्याज असते़ परंतु या योजनेत २०११-१२ पासून केंद्र व राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना व्याजाचा परतावा मिळालेला नाही़ शेकडो शेतकऱ्यांना शासनाकडून परतावा मिळण्याची प्रतीक्षा आहे़ आता दुष्काळ सदृष्य स्थितीमुळे महसुलात सुट, ३३ टक्के विजदरात सुट, सहकार कर्जाचे रुपांतर, कर्ज वसुलीस स्थगिती, पीककर्जाचे पुनर्गटन आदी योजना राबविण्याचे निर्देष आहेत़ मात्र याकडे दुर्लक्ष करीत शेतकऱ्यांकडून कर्जांच्या वसुल्या सुरु आहेत, असेही अॅड. पाटील म्हणाले.