२१ वाहनधारकांकडून साडेतीन लाख दंड वसूल

By Admin | Updated: November 19, 2014 13:11 IST2014-11-19T13:01:11+5:302014-11-19T13:11:05+5:30

जिल्ह्यात गौण खनिजाची सुरू असलेली मोठय़ा प्रमाणातील लूट रोखण्यासाठी महसूल विभागाने उशिरा का होईना प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

Recovers three and a half lakh penalty from 21 vehicles | २१ वाहनधारकांकडून साडेतीन लाख दंड वसूल

२१ वाहनधारकांकडून साडेतीन लाख दंड वसूल

नांदेड: जिल्ह्यात गौण खनिजाची सुरू असलेली मोठय़ा प्रमाणातील लूट रोखण्यासाठी महसूल विभागाने उशिरा का होईना प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. १८ नोव्हेंबर रोजी महसूलच्या ४ पथकाने २१ वाहनधारकांकडून ३ लाख ५0 हजार रूपयांचा दंड वसूल केला.
शहरात सोमवारी विश्रामगृहात झालेल्या बैठकीत माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी महसूल विभागाला अवैध गौण खनिजाच्या बेसुमार लूटप्रकरणी धारेवर धरले होते. वाळूच्या अर्मयाद उपशामुळे पर्यावरणाची हानी तर होतच आहे पण जिल्ह्यातील रस्त्यांचीही चाळणी झाली आहे. याकडे महसूल विभागाने थोडे लक्ष द्यावे अशी सूचना खा. चव्हाण यांनी केली होती. 
त्यानंतर मंगळवारी सकाळीच महसूल विभागाने कारवाईला प्रारंभ केला. नांदेड शहर परिसरात वाळू, वीट, मुरूम आदी गौण खनिजाची अवैधरित्या वाहतूक करणार्‍या २१ वाहनधारकांकडून ३ लाख ५0 हजारांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई तहसीलदार एम. ए. किरवले, नायब तहसीलदार पांगरकर, मुपडे, नागरवाड, तलाठी वच्छेवाड, पठाण आदींनी केली.
दरम्यान, गौण खनिजाची होणारी अवैध वाहतूक रोखण्यासाठी ६ पथकांची स्थापना करण्यात आल्याची माहिती नांदेडचे तहसीलदार एम.ए. किरवले यांनी दिली. ही पथके सकाळी सहा वाजेपासूनच चैतन्यनगर, आसना पॉईंट, वाजेगाव, लातूर रोड येथे तैनात करण्यात येणार आहेत. /(प्रतिनिधी)

Web Title: Recovers three and a half lakh penalty from 21 vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.