शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
4
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
5
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
6
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
7
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
8
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
9
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
10
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
11
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
12
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
13
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
14
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
15
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
16
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
17
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
18
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
19
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
20
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण

अडीच वर्षांपासून रेकॉर्ड गायब !

By admin | Published: October 31, 2014 12:27 AM

महेबूब बक्षी , भादा ‘विना सहकार, नाही उध्दार’ या तत्त्वावर चालणाऱ्या भादा येथील सोसायटीचा कारभार रामभरोसे झाला आहे़ तब्बल अडीच वर्षांपासून नव्या संचालक मंडळ व सचिवास

महेबूब बक्षी , भादा‘विना सहकार, नाही उध्दार’ या तत्त्वावर चालणाऱ्या भादा येथील सोसायटीचा कारभार रामभरोसे झाला आहे़ तब्बल अडीच वर्षांपासून नव्या संचालक मंडळ व सचिवास सोसायटीचे जूने संपूर्ण रेकॉर्डच मिळाले नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे़ या सोसायटीचे रेकॉर्डच गायब झाले असतानाही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे़औसा तालुक्यातील भादा येथील सोसायटीचा कारभार यापूर्वी जिल्ह्यात चर्चेत होता़ १३ सदस्यीय सोसायटीत सध्याच्या बँक आॅडिट प्रमाणे १५१५ सभासद असून ५ कोटींची थकबाकी असल्याची बँकेत नोंद आहे़ इ़स़ २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत मागील सत्ताधारी जनार्धन पाटील यांचे पॅनेल पराभूत झाल्याने सोसायटीची सत्ता सरपंच बालाजी शिंदे यांच्याकडे गेली़ परंतु, रेकॉर्ड मात्र ९ वर्षांपासून काम पाहणारे सचिव पी़ आऱ माळी यांच्याकडेच राहिले़ नव्या संचालकांना रेकॉर्ड मात्र अद्याप मिळाले नाही़ सध्या या संस्थेतून कर्ज वाटप नोंद वही, वसूली नोंद वही, जमा पावती, खर्च पावती, किर्द नोंदी, प्रोसिडिंग बुक, नोटीस बुक, शेअर्स खतावणी, शुभमंगल योजनेचे रेकॉर्डही गायबच आहे़ रेकॉर्ड मिळवण्यासाठी संबंधित सचिवाने जिल्हा देखरेख सहकारी संस्थेकडे सतत पत्रव्यवहार केला मात्र त्याचा उपयोग झाला नसल्याचे दिसून येते़ सध्या भादा सोसायटीत सभासद किती, कर्ज वाटप किती आणि कुणाच्या नावे कर्ज वाटप झाले याची नोंदच नाही़ सावळ्या गोंधळाच्या कारभारामुळे सभासदांना फटका बसत आहे़ सोसायटीचा कारभार पूर्वी उत्कृष्टरित्या होता़ मात्र, आता रेकॉर्डच नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे़ यास जबाबदार कोण? असा सवाल होत आहे़आमच्याकडे रेकॉर्डच नाही, त्यामुळे आम्ही पुरेपुर माहिती सभासदांना देवू शकत नाही़ कर्ज वाटपाबाबत सोसायटीची स्थिती नाजूक आहे, असे संस्थेचे चेअरमन बालाजी शिंदे यांनी सांगितले़४नव्या संचालक मंडळाच्या निवडीपासून भादा सोसायटीचे रेकॉर्ड अपुरेच आहे. पी़ आऱ माळी हा पूर्वीचा सचिव संस्थेचे रेकॉर्ड देत नाही़ तसे आम्ही वरिष्ठांना कळविले आहे़ त्यानुसार कार्यवाही ही झाली असल्याचे सहाय्यक निबंधक वसंत घुले यांनी सांगितले़ ४मी मागील ७ महिन्यांपासून संस्थेचा कारभार पाहतो़ माझ्याकडेही रेकॉर्ड नसल्याने मला सभासद संख्या किती, कर्ज वाटपाचा आकडा किती, कोणत्या सभासदावर कर्ज काढले याबाबत मला माहिती नाही़ बँकेच्या आॅडिट प्रमाणे व बँकेतील नोंदीवरुन कर्जाचा व्यवहार पाहतो़ त्यामुळे माझाही नाईलाज झाला आहे, असे भादा सोसायटीचे सचिव जी़एस़साळुंके यांनी सांगितले़