मंगळवारी ‘रेकॉर्ड ब्रेक’ तापमानाची नोंद
By Admin | Updated: May 20, 2015 00:20 IST2015-05-19T23:56:23+5:302015-05-20T00:20:08+5:30
बीड: गत आठवड्यात जिल्ह्यात काही ठिकाणी आवकाळी पावसानंतर १५ मे पासून तापमानात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. यावर्षीच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४४.०८ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद

मंगळवारी ‘रेकॉर्ड ब्रेक’ तापमानाची नोंद
बीड: गत आठवड्यात जिल्ह्यात काही ठिकाणी आवकाळी पावसानंतर १५ मे पासून तापमानात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. यावर्षीच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४४.०८ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. वाढत्या तापमानाचा परिणाम पहावयास मिळाला. भर दुपारी शहरातील मुख्य रस्त्यांवर सुकसुकाट असल्याचे चित्र पहावयास मिळाले.
सकाळी साडे आठ वाजल्यापासूनच उन्हाळचे चटके बसायला सुरूवात झाली होती. सकाळी आकरा वाजेपर्यंत शहरातील रस्त्यांवर गर्दी होती. त्यानंतर मात्र शहरातील सुभाष रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगर नाका, बार्शी नाका या भागातील रस्त्यांवर भर दुपारी सुकसुकाट असल्याचे पहावयास मिळाले. शहरातील साठे चौक, भाजी मंडई भागात इतरवेळी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र मंगळवारी वाहने कमी प्रमाणात असल्याचे आढळून आले.
कापड मार्केटही सुनेसुने
सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. वधू-वराकडील मंडळींची लग्नाच्या बस्त्यांची खरेदी सुरू आहे. मात्र मागील पाच दिवसात उन्हाचा पारा मोठ्याप्रमाणात वाढत असल्याने खरेदीला येणारे ग्राहक सकाळी आकराच्या पूर्वी अथवा किंवा सायंकाळी ५ नंतर कापड्याचा बस्ता खरेदीसाठी कपड्याच्या दुकानांवर गर्दी करत असल्याचे येथील कापड्याच्या व्यापाऱ्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)