सिल्लोड आणि सोयगावच्या एकत्रित पाणी पुरवठा योजनेस मान्यता

By Admin | Updated: May 24, 2017 22:16 IST2017-05-24T22:16:23+5:302017-05-24T22:16:23+5:30

मराठवाडा वाँटर ग्रेडींग प्रकल्पा अंतर्गत सिल्लोड च्या 130 व् सोयगाव च्या 70 अशा 200 गावांना येत्या काळात शुध्द व मुबलक पाणी पुरवठा व्हावा

Recognition for the integrated water supply scheme of Sillod and Soygaon | सिल्लोड आणि सोयगावच्या एकत्रित पाणी पुरवठा योजनेस मान्यता

सिल्लोड आणि सोयगावच्या एकत्रित पाणी पुरवठा योजनेस मान्यता

>ऑनलाइन लोकमत
 
सिल्लाेड(औरंगाबाद) दि. 24 - मराठवाडा वाँटर ग्रेडींग प्रकल्पा अंतर्गत  सिल्लोड च्या 130 व् सोयगाव च्या 70 अशा 200 गावांना येत्या काळात शुध्द व मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी एकत्रित पाणीपुरवठा याेजनेस महाराष्ट्र शासनाकडून तत्वता मान्यता मिळाल्याची माहीती आ. अब्दुल सत्तार यांनी बुधवारी(२४)दिली.
 
मराठवाडा वाँटर ग्रेडींग प्रकल्पाच्या अनुशंगाने सिल्लाेड तालुक्यातील १३० गावांना खडकपूर्णा धरनातून तर साेयगाव तालुक्यातील ७० गावांना वाघुर धरनातून शहराप्रमाणे शुद्ध व् मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी गेली अनेक दिवस माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार यांनी हा विषय शासन दरबारी लावून धरला होता. 
 
या याेजनेच्या सर्वेक्षणाची जवाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधीकरन यांना देन्यात आली असून त्यास लागनारा निधी उपलब्ध करून देन्यात आला आहे.सिल्लाेड व साेयगाव मतदार संघातील सर्वच गावांना या याेजनेतून मुबलक पाणी पुरवठा करण्यात येनार असून हा मतदारसंघ टँकरमुक्त हाेन्यास मदत हाेनार असल्याचे आ. सत्तार यांनी स्पष्ट केले.
 
राज्य शासनाने या याेजनेस मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेन्द्र फडनविस,पाणीपुरवठा मंत्री बबनराव लाेणीकर,सिंचन मंत्री गिरीष महाजन यांचे आ. अब्दुल सत्तार यांनी आभार मानले आहे.
 
पुढील शंभर वर्षाचे लागनाऱ्या  पाण्याचे नियाेजन या याेजनेतून पूर्ण हाेनार असून मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरुपी निकाली निघनारी ही याेजना मुर्त स्वरुपात येत असल्याचा आनंद समाधान देनारा असल्याचे त्यांनी सांगीतले.
 
याेजनेच्या मान्यतेवेळी मंत्री बबनराव लाेणीकर,मंत्री गिरीष महाजन व संबधित खात्याचे वरीष्ट अधिकारी यांची उपस्थिती हाेती.
 
 
 

Web Title: Recognition for the integrated water supply scheme of Sillod and Soygaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.