‘डीएनए’ अहवाल मिळाला
By Admin | Updated: July 7, 2014 00:33 IST2014-07-06T23:58:05+5:302014-07-07T00:33:25+5:30
कुरूंदा : दीर्घ प्र्रतिक्षेनंतर कुरूंदा येथील दोन सांगाडा प्रकरणी ४ जुलै रोजी डीएनए अहवाल मिळाला

‘डीएनए’ अहवाल मिळाला
कुरूंदा : दीर्घ प्र्रतिक्षेनंतर कुरूंदा येथील दोन सांगाडा प्रकरणी ४ जुलै रोजी डीएनए अहवाल मिळाला असून तपास अधिकारी डीवायएसपी पियुष जगताप हे तपासकामी दिल्लीला गेल्याने ‘डीएनए’चा अहवाल सध्या गुप्त ठेवण्यात आला आहे. पियुष जगताप हे दिल्ली येथून आल्यानंतर ‘डीएनए’ अहवालातील माहिती समोर येणार आहे.
कुरूंदा येथील एका कोरड्या पाण्याच्या टाकीत दोन मानवी सांगाडे सापडले होते. त्यापैकी एक युवकाचा तर एक युवतीचा सांगाडा होता. गावातील बेपत्ता युवकाचा व बेपत्ता महिलेच्या नातेवाईकांचा रक्त नमुना घेवून मुंबईच्या कालिना प्रयोगशाळेत ‘डीएनए’साठी पाठविण्यात आला होता. डीएनए आणण्यासाठी कुरूंदा पोलिसांनी अनेक हालापेष्ठा सहन कराव्या लागल्या. डीवायएसपी पियुष जगताप यांनी डीएनए आणण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याने अखेर ४ जुलै रोजी मुंबईच्या प्रयोगशाळेत हा अहवाल कुरूंद्याचे पोलीस निरीक्षक नानासाहेब नागदरे यांच्याकडे सोपविला आहे. हे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून प्रसार माध्यम व इलेक्ट्रानिक मीडियाने लावून धरले होते. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर ‘डीएनए’साठी हालचाल निर्माण झाली होती. डीएनए सीलबंद असल्याने त्याची माहिती समोर आली नाही. पोलिस अधिकारी पियुष जगताप हे सध्या दिल्ली येथे तपास कामासाठी गेल्याने दोन ते तीन दिवस अहवालाची माहिती बाहेर येण्यास प्रतिक्षा करावी लागणार आहे. या अहवालाच्या सोक्षमोक्षानंतर तपास कामाला गती मिळण्याची शक्यता आहे.(वार्ताहर)