शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

फुलंब्रीत शिंदेसेनेच्या जिल्हाध्यक्षांची बंडखोरी कायम, महायुती-महाविकास आघाडीस आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 17:58 IST

विशेष म्हणजे, लोकसभेला दीडलाख मत घेणारे साबळेही मैदानात आहेत

फुलंब्री : फुलंब्री विधानसभा मतदारसंघात आज ६५ पैकी एकूण ३८ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. मात्र, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष रमेश पवार यांची बंडखोरी कायम आहे. विशेष म्हणजे, मनोज जरांगे समर्थक सर्व १५ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारासोबत आता एकूण २७ उमेदवारांमध्ये लढत होईल. मात्र, पवार रिंगणात असल्याने महायुतीच्या उमेदवाराची धावपळ उडण्याची शक्यता आहे.

फुलंब्री मतदार संघात आता महाविकास आघाडीचे उमेदवार विलास औताडे, महायुतीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष रमेश पवार या तीन प्रमुख उमेदवारासह एकूण २७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात लोकसभा निवडणुकीत दीड लाख मतदान मिळवलेले मंगेश साबळे देखील मैदानात आहेत. मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याने महाविकास आघाडी आणि महायुती यांना दिलासा मिळाला. पण शिंदेसेना बंडखोर रमेश पवार यांच्या उमेदवारीमुळे महायुतीला अडचणी येण्याची शक्यता आहे. 

जरांगे समर्थक १५ उमेदवारांच्या हाती निराशा मतदार संघात मनोज जरांगे पाटील जो उमेदवार देतील त्या उमेदवाराच्या मागे राहून त्यांना निवडून आणायचे कोणत्याही पक्षाच्या व्यासपीठावर जाणार नाही, अशी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेणाऱ्या १५ उमेदवारांच्या हाती निराशा आली. जरांगे यांच्या निर्णयानंतर सर्वांनी माघार घेतली. यात किशोर बलांडे यांचा देखील समावेश आहे. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी बलांडे यांची उमेदवारी जाहीर केली होती. मागील दोन वर्षापासून त्यांनी मतदारसंघ पिजून काढला होता. पण जरांगे पाटील यांच्या निर्णयाने त्यांचा हिरमोड झाला. 

दोनवेळा भाजपा, दोनदा भाजपाफुलंब्री मतदार संघात मागील ४ निवडणुकीत दोनवेळा कॉंग्रेस तर दोन वेळा भाजपाचे उमेदवार निवडून आलेले आहे. आता या निवडणुकीत महायुती मधील घटक पक्षाचे  बंडखोर उमेदवार कोणाच्या फायद्यात तर कोणाला तोटा करतात हे समजून येईल. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४phulambri-acफुलंब्रीmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर