महाविकास आघाडीतही बंडखोरी, प्रहारतर्फे सचिन ढवळे उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:26 IST2020-11-12T07:26:49+5:302020-11-12T07:26:49+5:30

मसापच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात प्रहारचा मोठा मेळावाही बच्चू कडू यांच्या उपस्थितीत झाला. त्यानंतर त्यांनी एका पत्रकार परिषदेत या उमेदवारीसंदर्भात ...

Rebellion in Mahavikas front too, Sachin Dhawale candidate from Prahar | महाविकास आघाडीतही बंडखोरी, प्रहारतर्फे सचिन ढवळे उमेदवार

महाविकास आघाडीतही बंडखोरी, प्रहारतर्फे सचिन ढवळे उमेदवार

मसापच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात प्रहारचा मोठा मेळावाही बच्चू कडू यांच्या उपस्थितीत झाला. त्यानंतर त्यांनी एका पत्रकार परिषदेत या उमेदवारीसंदर्भात विश्लेषण केले. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

हो, आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत; परंतु आमचा उमेदवार सक्षम असून, तो निवडून येण्याच्या स्थितीत असल्याने त्यालाच महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा, असे आमचे म्हणणे आहे, असे सांगत बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांचा फोन आल्यानंतर काय करायचे ते ठरवू, असे स्पष्ट केले.

महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांचे नाव जाहीर झाले आहे. यापूर्वी या मतदारसंघातून तेच निवडून आले होते.

शिक्षकांच्या व बेरोजगारांच्या प्रश्नांवर आम्ही ही निवडणूक लढवीत असल्याचे कडू यांनी जाहीर केले.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेल्या मेळाव्याला प्रचंड गर्दी झाली होती. सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला होता.

यावेळी त्यांना विविध शिष्टमंडळांनी निवेदने सादर केली.

Web Title: Rebellion in Mahavikas front too, Sachin Dhawale candidate from Prahar