शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

निरंतर ग्रंथांच्या गराड्यात राहणारे विद्रोही विद्वान...राजा ढाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 19:00 IST

दलित पँथरचे संस्थापक, आक्रमक नेते, थोर साहित्यिक राजा ढाले यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे औरंगाबादेतील त्यांचे समकालीन, कार्यकर्त्यांमध्ये शोक पसरला. अनेक कार्यकर्ते व नेत्यांनी आपल्या शोकभावना कळवल्या आहेत.

राजा ढाले : विद्रोही विद्वानराजा ढाले म्हणजे विद्वान, विद्रोही व बंडखोर व्यक्तिमत्त्व! तर्कशास्त्राचे, तसेच बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक, रोखठोक. राजाभाऊंची मांडणी विद्वत्तापूर्ण असायची. प्रवाहाच्या विरुद्ध पोहणारा हा पट्टीचा खेळाडू होता. प्रस्थापित साहित्यिकांना आव्हान देऊन त्यांच्याशी वैचारिक दोन हात करण्याची ताकद राजाभाऊंमध्ये होती. दलित आणि आंबेडकरी साहित्याची रुजुवात करणारा हा अग्रणी साहित्यिक होता. लिट्ल मॅग्झिनच्या माध्यमातून प्रस्थापितांविरोधात निकराने लढणारा सेनापतीच. पँथरसारख्या आक्रमक चळवळीचा नेता आणि तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हणजे राजा ढाले. वयाच्या पंचविशीतच त्यांंनी पँथरची डरकाळी फोडली. कडव्या पँथरचे त्यांचे रूप १९७२ साली उभ्या महाराष्ट्राने पाहिले. वरळीच्या दंगलीमध्ये पँथरने शिवसेनेबरोबर कडवी झुंज दिली. नेतृत्व अर्थातच राजाभाऊंचे होते. या दंगलीत पँथर भागवत जाधव व देवरुखकर यांना शहीद व्हावे लागले. घराघरातील लढाऊ माता-भगिनी चुलीवर गरम पाणी व त्या उकळत्या पाण्यात मिरचीची पूड टाकून घरात घुसणाऱ्या गुंडांना घायाळ करीत असत. पँथरने याचा हिशोब १९७४ च्या लोकसभा निवडणुकीत चुकता केला. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यासाठी ही लढाई प्रतिष्ठेची होती. तुमच्या ज्याही मागण्या असतील त्या मान्य करू; परंतु तुम्ही आम्हाला म्हणजे काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन नाईक यांनी राजा ढाले व त्यांच्या सहकाऱ्यांना केले.

राजा ढाले आणि त्यांचे सहकारी नामदेव ढसाळ, ज.वि. पवार, भाई संगारे, अविनाश महातेकर आदींनी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. आंबेडकरी जनतेने कडक बहिष्कार टाकला. याचा परिणाम असा  झाला की, काँग्रेसचे बलाढ्य उमेदवार पराभूत झाले व कॉ. रोझा देशपांडे विजयी झाल्या. पँथरची राजकीय भूमिका, दलितांच्या मतांची किंमत जनतेला व काँग्रेसलाही कळली; परंतु नंतर पँथर फुटली व ताकदीचे राजकारण पुढे करता आले नाही. जर पँथरने हेच राजकारण पुढे नेले असते तर महाराष्ट्रात वेगळे चित्र निर्माण झाले असते. साधना साप्ताहिकातील राजाभाऊंच्या लेखाने त्यावेळी प्रचंड खळबळ उडाली होती. दलित महिलेची इज्जत घेताना तिचे लुगडे फेडले जाते. ते लुगडे व तिरंगा ध्वज दोन्हीचे कापड एकच; परंतु एका कपड्याचा अपमान होतो, तेव्हा सहा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा आणि एका कपड्याचा अपमान झाला म्हणून ५० रु. दंड.... या विसंगत न्यायावर त्यांचा हा कोरडे ओढणारा लेख खूपच गाजला होता.

निरंतर ग्रंथांच्या गराड्यात असत

शांताराम पंदेरे आणि राजाभाऊ ढाले यांची जवळीक होती. भारिप-बहुजन महासंघाच्या माध्यमातून दोघांनी एकत्रित काम केले. आपल्या शोकसंवेदना व्यक्त करताना शांताराम पंदेरे म्हणतात, ‘‘राजाभाऊ ढाले हे फुले-आंबेडकरी इतिहास, विचार आणि चळवळीचे भाष्यकार होते. १९६०-७० च्या दशकात नामदेव ढसाळ व अन्य सहकाऱ्यांसोबत राजाभाऊंनी दलित पँथर उभी केली. तुरुंगवास भोगला. यानिमित्ताने राष्ट्रीय  व आंतरराष्ट्रीय पातळीवर चळवळीकडे लक्ष वेधले व चर्चाही झाली. भारिप-बहुजन महासंघाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि हायस्कूल-कॉलेजच्या कालावधीत मला बौद्ध धम्म, फुले-आंबेडकर, समाजवादी-साम्यवादी, काँग्रेस आदी पक्ष व विचारांची चिकित्सक ओळख करून देणारे, माझ्या जीवनाला आकार देणारे आणि आपल्या उतारवयात निरंतर ग्रंथांच्या गराड्यात राहणारे आदरणीय राजाभाऊ ढाले आज आपल्यात राहिले नाहीत. आज सर्वत्र मंदिरांमध्ये गुरुपौर्णिमा साजरी होत आहे. माझ्या या गुरूला साष्टांग दंडवत!’’

महानायक हरपलाआंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते, प्रसिद्ध विचारवंत राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महाराष्ट्रात दलितांवर अन्याय-अत्याचाराची परिसीमा गाठली गेली असताना जातीयवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचे मोठे पाऊल राजा ढाले यांनी उचलले होते. जिथे जिथे अन्याय व अत्याचार होत असत, त्या ठिकाणी राजा ढाले, मी व आमचे पँथर जाऊन धडक देत व जातीयवाद्यांना धडा शिकवत होतो. राजा ढाले निर्भीड व लढाऊवृत्तीचे होते. पँथर्स रिपब्लिकन पार्टीतर्फे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.- गंगाधर गाडे

आंबेडकरी चळवळीचे नुकसान  राजा ढाले हे दलित पँथरचे संस्थापक अध्यक्ष होते. १९७२ साली त्यांनी पँथरची स्थापना केली आणि महाराष्टÑात अन्याय-अत्याचाराविरुद्ध झंझावात सुरू झाला. पँथरच्या रूपाने सामान्यजनांचे, कर्मचाऱ्यांचे रक्षण करणारे एक संघटन उभे झाले.  राजाभाऊंच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. ‘रिपाइं ए’तर्फे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.    - बाबूराव कदम 

सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तनाचे नेते     आंबेडकरी विचारांचे गाढे अभ्यासक आणि दलित पँथर्सचे संस्थापक राजा ढाले यांच्या निधनाने महाराष्ट्रातील दलित, परिवर्तनवादी चळवळीची मोठी हानी झाली आहे. जात-जमातवादी शक्तींनी देश, समाज आणि संविधानासमोर मोठे आव्हान उभे केले असताना वैचारिक परिवर्तनाचा समृद्ध वारसा असलेले राजा ढाले यांचे निधन अधिक वेदनादायी आहे. संवैधानिक लोकशाही मूल्यांचा वसा चालविणारे राजा ढाले आयुष्यात शेवटपर्यंत बाजारू राजकारणापासून दूर राहिले. ढाले यांना भावपूर्ण श्रद्धांजली. - अ‍ॅड. विष्णू ढोबळे, राज्याध्यक्ष, समाजवादी जनपरिषद

अभ्यासू नेतृत्वाला मुकलोराजा ढाले हे दलित पँथरच्या काळातील अग्रगण्य नेते होते. त्यांना प्रचंड समयसूचकता होती. वक्तृत्व सुंदर होते. एका अभ्यासू नेत्याला आम्ही मुकलो आहोत. ‘रिपाइं ए’तर्फे मी दिवंगत राजाभाऊंना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो.     - मिलिंद शेळके 

तडजोडींना भीक न घालणारा नेता राजा ढाले यांनी पँथरची स्थापना करून महाराष्ट्रात जोश निर्माण केला होता. त्यांनी शेवटपर्यंत कोणत्याही राजकीय तडजोडींना भीक घातली नाही. असा एक निर्भीड व सच्चा आंबेडकरवादी नेता आज आपल्यातून हरपला. मी भूमिपुत्र जनआंदोलनतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.    - मधुकर भोळे

आंबेडकरी चळवळीचा अध्वर्यू गेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर आंबेडकरी समाजात शिथिलता निर्माण झाली होती. दलितांवरील अत्याचार वाढले असताना विद्रोही साहित्यातून, जाज्वल्य विचारातून राजा ढाले यांनी दलित पँथर या लढाऊ संघटनेला जन्म दिला. त्यामुळे आंबेडकरी चळवळीत स्वाभिमानी व लढाऊ कार्यकर्त्यांची एक फौज निर्माण झाली. बाबासाहेबांनंतर आंबेडकरी चळवळीचा अध्वर्यू राजा ढाले यांच्या रूपाने हरपला आहे. मी रिपाइं डेमॉक्रॅटिक पक्षाचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.    - रमेश गायकवाड

टॅग्स :SocialसामाजिकDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद